Home विदर्भ मिटकॉनच्या पुढाकारातून महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कार्बन क्रेडिट…

मिटकॉनच्या पुढाकारातून महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कार्बन क्रेडिट…

187

महोगनी कृषि-वानिकी लागवडीतून विश्वातील पहिला कार्बन क्रेडिट प्रकल्प… 

मनिष गुडधे अमरावती.
पर्यावरण संतुलन अबाधित राखण्यासाठी मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीरिंग सर्विसेस लिमिटेड, मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स व महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेडच्या पुढाकाराने महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा मोबदला मिळणार आहे. कृषी वनीकरण व पुनर्वनीकरण (Afforestation and Reforestation) प्रकल्पाला वेरा (VERRA) रजिस्ट्री अंतर्गत यशस्वीरीत्या प्रमाणित केले आहे. या यशाचे सर्वत्र ठिकाणावरून कौतुक होत आहे. महोगनी कृषि-वानिकी हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना आणि गुजरात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून यापुढे शेतकऱ्यांना विविध पिकांद्वारे या कार्बन क्रेडिट उपलब्ध होईल. मिटकॉन पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी कृषी वनीकरण पद्धतींचा आदर्श ठरते. शेतकरी बंधूंच्या सहकाऱ्यांने व्यावसायिक तत्वावर सहा हजार एकरवर महोगनी लागवड करण्यात आली आहे. मिटकॉनचा भारतातील महोगनी लागवड हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्वच्छ विकास यंत्रणा (CDM) कार्यपद्धती मानकांचे अनुपालन करतो आणि मिटकॉनने जागतिक वृक्ष आधारित कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये सहभागी होऊन शेतीचा शाश्वत विकास व शेतकरी आर्थिक सक्षमीकरणाचा पर्याय उपलब्ध केला आहे. अमरावती जिल्ह्यातील व तालुक्यातील मोहगनी लागवडी करीता संपर्क साधा. सचिन भाऊ रामटेके 9322591797