Home मराठवाडा जालना औरंगाबाद महामार्गावर बदनापूर फुले नगर जवळ सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मोटार...

जालना औरंगाबाद महामार्गावर बदनापूर फुले नगर जवळ सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मोटार सायकल धडकेत एक जण ठार .

99
0

बदनापूर प्रतिनिधी

जालना , दि. ०५ :- पुणे येथून नांचनगाव ता. देवुळी जि. वर्धा येथे कार क्रमांक एम एच ३२ वाय ४१८६ मधून जात असताना बदनापूर येथे फुले नगर येथे लगूशंकेसाठी थांबले असता कारमधून उतरले असता औरंगाबाद कडून जालना कडे जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम एच २० ईसी २१६० च्या चालकाने भरधाव वेगाने शकील खाॕन रा. नाचंनगाव ता. देवूळी जिल्हा वर्धा यांना जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले .त्यांना जालना येथिल सामान्य जिल्हा रुग्णालय येथे नेले असता डाॕक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले .यावरून संदिप नारायणराव पारीसे या वाहन चालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन वरील मोटार सायकल चालक यांच्या विरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवून मरणास कारणीभूत झाला म्हणून वरील मोटार सायकल चालका विरुध्द ३०४ (अ) , २७९, ३३७, ३३८ भादवी सह १३४/१७७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सह्याक पोलिस उपनिरीक्षक आय एम शेख करीत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले .

Unlimited Reseller Hosting