
यवतमाळ : बुलेट चोरणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या चोरट्यांचे यवतमाळ, परभणी या जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे नेटवर्क असून, चोरटयांना ताब्यात घेवुन ७,५०,०००/- रुपये किंमतीच्या ९ मोटार सायकल हस्तगत केल्या आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे ही कारवाई केली.
करन रमेश शिंदे वय २३ वर्षे रा. अंबा भवानी नगर ता. जि. परभणी, अवतारसिंग जंगुसिंग जुनी वय ३५ वर्षे रा. जनकापुर ता. नागभिड जि. चंद्रपुर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर आरोपी अनिल सोळंके वय २२ वर्षे रा. महागांव हा फरार आहे. २० ऑक्टोंबर रोजी रमेश शिंदे हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट विक्री करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. यावेळी पोलीस आल्याचा संशय आल्याने आरोपी करन शिंदे पळ काढण्याच्या तयारीत असतानांच त्यास ताब्यात घेतले. सदर बुलेट शिवाजी शाळा वाशिम रोड पुसद येथून चोरी केल्याचे सांगीतले. बुलेट मोटरसायकल बाबत पोस्टे वसंतनगर पुसद येथे अप क्रमांक ३४७/२३ कलम ३७९ भादंवि चा गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस विश्वासात घेवुन विचारुपस केली असता त्याने मागील दिड वर्षांत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, खंडाळा, परभणी व आदिलाबाद (तेलंगणा) येथुन त्याचा साथीदार अनिल सोळंके वय २२ वर्षे रा. महागांव याचे मदतीन चोरी केली. अवतारसिंग जंगुसिंग जुनी रा. जनकापुर ता. नागभिड जि. चंद्रपुर यास विक्री केल्याचे सांगीतले. आरोपी करन शिंदे याचेसह जनकापुर नागभिड येथे जावुन अवतारसिंग जंगुसिंग जुनी यास ताब्यात घेवुन त्याचेजवळुन चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपी करन रमेश शिंदे वय २३ वर्षे रा. अंबा भवानी नगर ता. जि. परभणी, अवतारसिंग जंगुसिंग जुनी वय ३५ वर्षे रा. जनकापुर ता. नागभिड जि. चंद्रपुर यांचे जवळुन रॉयल इनफिल्ड कंपनिच्या ५ बुलेट, १ बजाज पल्सर, १ बजाज प्लॅटिना, १ हिरो स्प्लेंडर, १ होन्डा सिबी शाईन अशा एकुण ९ मोटरसायकली किंमत ७,५०,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला. पोस्टे वसंतनगर अप क्रमांक ३४७/२०२३ कलम ३७९ भादंवि, पोस्टे दिग्रस अप क्रमांक ६२० / २३ कलम ३७९ भादंवि, पोस्टे खंडाळा अप क्रमांक ४१६ / २३ कलम ३७९ भादंवि असे चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले. हस्तगत केलेल्या मोटरसायकलची माहीती घेणे सुरु असुन यवतमाळ, परभणी, आदिलाबाद (तेलंगणा) या जिल्हयातील मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी करन रमेश शिंदे, अवतारसिंग जंगुसिंग जुनी यांना जप्त मुददेमालासह पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. दिग्रसचे ताब्यात देण्यात आले. तर फरार आरोपी अनिल सोळंके याचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, चालक पोउपनि रेवन जागृत, पोलीस अमलदार तेजाब रंणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, पंकज पातुरकर, बबलू चव्हाण, सुनिल पंडागळे, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, चालक अमित कुमरे यांनी केली.












































