
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:- बायगाव खुर्द येथे शेतकरी संघटनेच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अपात्र झालेले 295 शेतकरी एक वर्षापासून पीएम किसान योजनेपासून प्रत्येकी 6000 प्रमाणे 17 लाख 70 हजार रुपयांपासून वंचित आहे. जवळपास हे सर्वच गाव वंचित झाले आहे आणि दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी वैकल्यग्रस्त आहे ही शासनाची चूक शेतकरी संघटनेच्या वतीने 29 मार्च 2023 रोजी माननीय तहसीलदार देऊळगाव राजा यांना निवेदन देऊन विनंती केली,दिनांक 11.4.23 रोजी माननीय तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे 130 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले,दिनांक 28.4.23 रोजी माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले,दिनांक 30.7.23 रोजी माननीय आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना निवेदन दिले, दिनांक 17.8.23 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, दिनांक 28.8.23 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना अर्ध नग्न आंदोलनाचा इशारा दिला होता.शासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दिनांक
27 .9.23 रोजी मुंबई मंत्रालय येथे धनंजय मुंडे कृषी मंत्री यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष निवेदन दिले परंतु शासनाचे अधिकारी कर्मचारी टोलवाटोलवी करतात म्हणून आज हे शेतकरी धरणात “खडकपूर्णा जलाशयात” बायगाव खुर्द येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे 100 फूट खोल नदीत शेतकरी अर्धनग्न होऊन पाण्यात बसले आहेत. धरणामध्ये अर्धनग्न शेतकरी तेजराव मुंडे,शिवाजी काकड, संजय गाढवे,कारभारी गाढवे, जगन मांटे,अरुण शेरे,भार्गव गाढवे,रमेश डोईफोडे,विठोबा मांटे,पंडित गाढवे,गुलाबराव जाधव,मुरलीधर जायभाये, भानुदास दहातोंडे,संजय जायभाये,गजानन टेकाळे,कोंडू दहातोंडे,प्रकाश गाढवे,नरहरी खारडे,उत्तमराव गाढवे,शेख निजामभाई,भास्कर पाटोळे इत्यादी जवळपास 200 शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहेत बसले आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा व 295 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी. सदर प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन आंदोलनावर ठाम राहण्याची शक्यता आहे होणाऱ्या संपूर्ण परिणामास प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा आंदोलनाकाच्या वतीने देण्यात येत आहे आंदोलनाचे नेतृत्व तेजराव मुंडे. शेतकरी संघटना. तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा हे करत आहेत












































