Home यवतमाळ छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा उत्सव मंडळ तर्फे विविध कार्यक्रम चे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा उत्सव मंडळ तर्फे विविध कार्यक्रम चे आयोजन

338
 यवतमाळ १८ हाताची भव्य अशी आई सप्तश्रृंगी देवीची मुर्ती स्थापना करतात म्हणून प्रसिद्ध आहे. या वर्षी मंडळाच्या वतीने स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई सप्तश्रृंगी देवीची आरती करतांनाचा देखावा सादर करणार आहे. तसेच या नवरात्र उत्सवानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
डाॅ.रोशन शाकाहार डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. हरिष तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर घेणार आहे. वसंतराव नाईक हॉस्पिटलमध्ये ३ दिवस अल्पोपहार वाटत करणार आहे
त्याप्रमाणे यवतमाळचे प्रसिद्ध जगराता गायक जितू पाखरे यांच्या जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती चित्र लावण्यात येणार असून अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे
मंडळाचे अध्यक्ष सांगर सुर्यवंशी, सुरज साळुंके मयुर लोखंडे, विशाल सहारे , संजय शिंदे निखिल जुकनाके , आकाश सुर्यवंशी, बंडू, रुपेश चव्हाण कामडे,अभिजित साळुंके अक्षय भोसले व मंडळाचे ईतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवासाठी मेहनत घेत आहेत.