Home यवतमाळ खापरी येथे अतिक्रमण करून मान्यता मिळविलेल्या कॉन्व्हेन्टची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण...

खापरी येथे अतिक्रमण करून मान्यता मिळविलेल्या कॉन्व्हेन्टची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण..!

130

➡️ घाटंजी पंचायत समिती समोर अक्षय विरदंडे यांचे आमरण उपोषण सुरू..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 3 ऑक्टोंबर : घाटंजी तालुक्यातील ईस्तारी नगर, खापरी येथे सर्व्हे नंबर 19/2 च्या ओपन स्पेसमधे अतिक्रमण करून, जागेचे खोटे कागदपत्रे दाखवून, बेकायदेशीररित्या शासन मान्यता मिळवलेल्या मातोश्री विजयाताई बेलोरकर इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेन्टची मान्यता रद्द करून, सदरचे अतिक्रमण काढून टाकण्याच्या मागणीसाठी ईस्तारी नगर, खापरी येथील रहिवासी अक्षय विरदंडे यांनी 3/10/2023 रोजी पासून घाटंजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे.

या संदर्भात उपोषणकर्त्याने या पूर्वी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. यवतमाळ यांना चौकशीचे निर्देशही दिले होते. त्यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिनांक 27/6/2023 रोजीच्या पत्रान्वये गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती घाटंजी यांचे समवेत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. मात्र संबंधितांनी ३ महिने उलटून सद्धा कुठलीच कारवाई केली नव्हती, तदनंतर उपोषणकर्त्याने जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर दिनांक 25/9/2023 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिनांक 21/9/2023 रोजी दिल्यावर दिनांक 22/9/2023 रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती घाटंजी यांनी 3 दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र 7 दिवस उलटून सुद्धा कुठली कारवाई न केल्याने जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर नियोजित असणारे उपोषण दिनांक 3/10/2023 पासून घाटंजी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आहे.