Home यवतमाळ घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मुख्याधिकारी यांचे कडे...

घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मुख्याधिकारी यांचे कडे धनादेश द्वारे ₹ 76,205 जमा केले..!

153
➡️ घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी, 29 सप्टेंबर :- राज्यात देशात कर्मचारी, कामगार यांचे वेतनासाठी, रजेसाठी व इतर लाभासाठी संघटना कार्यरत आहे. परंतु अशी ही एक वेगळी कर्मचारी संघटना आहे कि, जी आपल्या कर्मचारी हिता सोबत सामाजिक, कार्यालयीन हित जोपासते. हि अशी संघटना अशी आहे कि, जी कर्मचारी यांचे निधन झाल्यास त्यांचे वारसास सानुग्रह अनुदान प्रदान करते. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास सेवानिवृत्त कर्मचारी यानां ड्रेस, पत्नीस पत्नी साडी – चोळी देवून निरोप समारंभ आयोजित करते. संघटना कर्मचारी यांच्‍या सुरक्षेकरीता कार्यालयात संघटनेच्या निधीतून CCTV कॅमेरे लावते. शासनाने ओला दुष्काळ काळात शेतक-यांना मदत करण्‍याचे आव्‍हाण केले होते, त्‍यास अनुसरुन ज्‍या संघटनेने माहे जून – 2023 मध्ये एक दिवसाचे वेतन रुपये 76,205/- चा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घाटंजी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या कडे धनादेशाव्‍दारे जमा केले आहे.
माजी सैनिक सहायता कल्‍याण निधी, यवतमाळ येथे दरवर्षी कर्मचारी यांचे वेतनातुन सहायता पुरविते. ज्‍या कर्मचारी संघटनेने शासनाच्‍या हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत नागरीकांना घरोघरी तिरंगा लावण्‍याकरीता मागील वर्षी रुपये 30,000/- तिरंगा ध्‍वज घेवुन नागरीकांस पुरविले. तसेच या वर्षी सुध्‍दा हर घर तिरंगा करीता कर्मचारी यांनी 1 दिवसाचे वेतन रुपये 87,000/- खर्च करुन नागरीकांना तिरंगा ध्‍वज पुरविले आहे. तसेच स्‍वच्‍छता पंधरवाडा निमित्‍य कार्यालयाची साफ – सफाई करुन संघटनेच्‍या निधीतुन कार्यालयाची रंगरंगोटी केली आहे. तसेच ज्‍या कर्मचारी संघटनेने आपल्‍या कार्यालयाचा स्‍थापना दिवस मोठ्या उत्‍साहात विविध कार्यक्रम घेवुन संपुर्ण कार्यालयात रोषनाई करुन साजरा केला. तसेच कर्मचारी संघटना शहरात आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या रक्‍तदान शिबिरामध्‍ये आवर्जुन भाग घेवुन रक्‍तदान करतात. अशी ही आगळी वेगळी स्‍वतः कर्मचारी सोबत सामाजिक हिताची जोपासणा करणारी ‘घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटना’ आहे
अश्‍या या ‘घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटना’ चे अध्‍यक्ष प्रकाश घोती, सचिव विक्की शिंदे यांचे सह संघटनेचे सर्व सदस्‍य यांचेव्‍दारे कर्मचारी यांचे हितासोबत सामाजीक हिताचे दायित्‍व जपण्‍याचे प्रयत्‍न संघटने तर्फे पार पाडत आहे.
एकंदरीत घाटंजी नगर परिषद कर्मचारी संघटनेने कार्य उत्तम रित्या सुरू आहे.