Home यवतमाळ “अवैध धंदे बंद करावे” मुख्यमंत्र्यांनसह गृह विभागाला निवेदन…!

“अवैध धंदे बंद करावे” मुख्यमंत्र्यांनसह गृह विभागाला निवेदन…!

153

 घाटंजी शहरातील अवैध धंदे करुन घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर यांच्यावर कार्यवाही करावी अशी तक्रार कज्जुम कुरेशी यांनी केली आहे,सदर तक्रारीत असे नमुद केले आहे की, मी एका वृत्तपत्रात बातमीदार म्हणून काम करतो,संपूर्ण विदर्भात घाटंजी शहराला शांत शहर म्हणुन ओळखले जाते.सर्व धर्मीय लोकं मिळुन मिसळून राहतात,परंतु घाटंजी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी रुजू झाल्या बरोबर शहराला अवैध व्यावसायिकांचे माहेरघर बनवले सारखे बनवून ठेवले आहे.शहरातील एस पी एम कन्या शाळेला लागुन जुगार,वरळी मटका,तितली या सारखे अवैध धंदे करण्यासाठी अवैध व्यावसायिकांना परवानगी दिली असल्याने जुगार मटका खेळणारे शाळेतील खिडकी जवळ जावुन लघवी करतात आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यीनीच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे.आणि पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर,तसेच शहरात जुने बसस्थानक,जुनी महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस च्या मागे, उर्दु शाळेच्या आजु बाजुला,मच्छी बाजार, तालुका सहायक निबंधक कार्यालय च्या समोर, हनुमान मंदिरच्या बाजुला,नविन बस स्थानकच्या आजु बाजुला व घाटी परिसरातील इंदिरा आवास,स्व.राजिव गांधी चौक,अहेमदीया मदरसा, ग्रामीण भागातील खेडे गाव अशा अनेक ठिकाणी अवैध व्यावसायिकांना अवैध व्यावसायची दुकान मांडुन बसले आहे,या बाबत अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध केले आहे,परंतु ठाणेदार निलेश सुरडकर पोलीसी रुबाब दाखवून तुम्हाला जे लिहायचे आहे लिहा,मी अवैध धंदे बंद करणार नाही.अशी भाषेचा वापर करतात.आज पर्यंत शहरात अवैध धंदे पहायला मिळाले नाही.इतके अवैध धंदे घाटंजी शहरात व घाटंजी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागात सुरू आहे.सामान्य नागरिकांच्या मनात ठाणेदार यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे सामाजिक भावनेतून मला तक्रार देण्याची वेळ आली आहे.जिल्हातील अनेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार एखाद्या वृत्तपत्रात अवैध धंदे बाबत बातमी प्रसिद्ध झाली तर संबंधित ठाणेदार अवैध व्यावसायिकांच्या नाकात दम आणतात, परंतु घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर आणखी जोमाने अवैध व्यावसायिक यांना अवैध व्यायसाय करण्यासाठी मुभा देतात.पोलीसाचे कर्तव्य असते की जनतेला सुरक्षा देणे, परंतु घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची भुमिका वेगळी आहे.माझ्या तक्रारीची दखल घेऊन घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे,व सक्षम अधिकारी मार्फत चौकशी करून ठाणेदार निलेश सुरडकर यांना बडतर्फ करावे.अन्यथा नाईलाजाने घाटंजी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल,सदर तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री,  विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा,

उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री , खासदार संजय राऊत, मुख्य सचिव, सचिव गृह विभाग, पोलीस महासंचालक, विभागीय पोलिस आयुक्त साहेब अमरावती पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलिस अधिकारी केळापुर यांच्याकडे पत्रकार कज्जुम कुरेशी यांनी दिली आहे