
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका म्हणून नगरपरिषद शाळा क्रमांक 5 च्या मुख्याध्यापिका सिंधुताई सिडाम तसेच अग्निपंख या संस्थेमार्फत आदर्श शिक्षिका म्हणून वृषाली अवचित यांना पुरस्कार जाहीर झाले आहे.

तसेच मतदारांचे h2h सर्वेक्षणाचे काम वेळेपूर्वी पूर्ण करणाऱ्या व तहसील कार्यालयाने आदर्श मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त तुषार बोबडे यांचा महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ शाखा घाटंजीच्या वतीने जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण पडलवार हे अध्यक्षस्थानी होते. तर घाटंजी नगर परिषद प्रशासन प्रशासन अधिकारी रुपेश कावलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नगरपरिषद शाळा क्रमांक पाचच्या मुख्याध्यापिका सिंधुताई सिडाम, मुख्याध्यापक अतहर सर, नाझीर सर, आशिष साखरकर, जिल्हा संपर्क प्रमुख शंकर मायकलवार, जिल्हा सहसल्लागर स्वाती भौंग आदीं उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना स्थानिक पातळीवर झालेल्या सत्काराला विशेष महत्त्व असल्याचे व हा घरचा सत्कार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष अरुण पडलवार यांनी संघटित राहून संघर्ष करण्याची तसेच नगर पालिकेच्या शाळेत अधिकाधिक प्रगती कशी होईल, यासाठी सर्व शिक्षकांचे प्रयत्न चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव अनिकेत निंबाळकर यांनी केले. तर आभार विपुल भोयर यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष साखरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरिता पडोळे, सोनिया पांडे, भारत नगराळे यांनी अथक परिश्रम केले.












































