Home मुंबई शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. प्रा.डाॅ.रिता मालचे मुबंई विद्यापीठ शिक्षक...

शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. प्रा.डाॅ.रिता मालचे मुबंई विद्यापीठ शिक्षक सिनेट निवडणूकीत अपक्ष रिंगणात…..

133

मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विषय गेली 16 वर्षे शिकवतात. विविध राष्ट्रीय सामाजिक संस्थामध्ये मोठया पदावर काम केले आहे.संशोधक व लेखिका आहेत.गेली 20 वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आदिवासी लोकांसाठी मोठे काम आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे व कोणतेही काम उत्कृष्ट रित्या करणे. समाजासाठी काम करणे हा त्याचा स्वभाव आहे.समाजात राष्ट्रीयत्व, बंधुता ,न्याय, समता या भावना निर्माण करणे व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे .डाॅ. रिता जी प्राध्यापकांच्या हितासाठी व उन्नतीसाठी,विविध प्रश्नांवर आंदोलन व निवेदन देऊन मागण्या विद्यापीठाकडून मान्य करून घेतल्या आहेत. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर न्याय हक्कासाठी नेहमी आघाडीवर असतात.खालील जाहीरनाम्यात सर्वच गोष्टीचा उल्लेख केला आहे.जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यात विविध संघटनांनी पाठींबा जाहीर केला.त्यामध्ये शिवसेना आमदार पाडवी,ऑल इंडिया अदिवासी कामगार संघटना,भारत, मुंबई विद्यापीठात शिक्षक सिनेट ST प्रवर्गातून बिनविरोध निवडून आलेले डाॅ.प्रा.विनोद कुमरे सर,शिवशाही शिक्षक आघाडी प्रमुख बाळाराम माडकर,महाराष्ट्र शिक्षक सेना,विविध राजकीय पक्षांनी पाठींबा दिला.यावेळी मालचे मॅडमनी मतदार बंधू भगिनींना  आहवान केले.

नमस्कार!!
 मी, डॉ. रिटा मालचे, सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ अधिसभा (Senate) निवडणूक, 2023 करिता महिला संवर्गातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. तरी मुंबई विद्यापीठातील सर्व प्राध्यापक सहकारी बंधू भगिनींना विनंती करते कि, कृपया मला आपला “पहिला (१) पसंतीक्रम” देउन प्रचंड मतांनी निवडून द्यावे, हि विनंती.