Home यवतमाळ पारवा वनपरिक्षेत्रातील सावंगी (संगम) येथील राखीव वनावर झालेले अतिक्रमण वन विभागाने हटविले..!

पारवा वनपरिक्षेत्रातील सावंगी (संगम) येथील राखीव वनावर झालेले अतिक्रमण वन विभागाने हटविले..!

117

➡️ पारवा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची अतिक्रमण धारकांवर धडक कार्यवाही..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पारवा वन परिक्षेत्रातील कुर्ली नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक C108a सावंगी (संगम) येथील राखीव वन क्षेत्र 30.00 हेक्टर क्षेत्रात सावंगी (संगम) येथील 13 गांवकऱ्यांनी वृक्ष तोड करुन शेती करण्याकरिता अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण करणारे सावंगी (संगम) येथील 13 गावकऱ्यांना वन प्रशासन मार्फत समज देऊन नोटीस पाठवली होती. त्यात स्वतः होऊन अतिक्रमण सोडण्यासंबधी कळविले होते. परंतु सदरचे समज व नोटीसला न जुमानता अतिक्रमण करणारे व्यक्तींनी अतिक्रमण सोडले नाही.

त्यामुळे वन प्रशासनामार्फत भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1-A) (a) प्रमाणे 13 जुन रोजी कार्यवाही करुन अतिक्रमण झालेले क्षेत्र ताब्यात घेतले आणि झालेले अतिक्रमण हटविण्यात आले.

सदरची कार्यवाही पांढरकवडा येथील उप वन संरक्षक किरण जगताप, पांढरकवडा येथील प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक सुभाष दुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पारवा येथील प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार, फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) आशिष वासनिक, घाटंजी येथील प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव, पाटापांगरा येथील वनपाल एम. सी. कांबळे, कुर्ली येथील वनपाल डी. ए. मेश्राम, पारवा येथील वनपाल शेख मंजूर शेख रऊफ, पाटापांगरा वनरक्षक एस. आर. मुळे, सायतखर्डा वनरक्षक जी. के. गहुकार, वाढोणा (खुर्द) वनरक्षक एस. एस. येसनसुरे या सह वन विभागातील ईतर अधिकारी व कर्मचारी आदीं उपस्थित होते. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता.