Home यवतमाळ पारवा येथील पराग मामीडवार यांचे घर व राजेश्वर कृषी केंद्रांवर सावकारी पथकाचा...

पारवा येथील पराग मामीडवार यांचे घर व राजेश्वर कृषी केंद्रांवर सावकारी पथकाचा छापा..!

99
➡️ अनेक खरेदी खत, डायरी, विक्री पत्र, बॅकेचे बचत खाते पुस्तिका, व्यवहार डायरी इत्यादी जप्त.
( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पारवा येथील पराग सुरेश मामीडवार यांचे घर व राजेश्वर कृषी केंद्रांवर सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था सावकारी पथकाने छापा टाकून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहे. या मुळे पारवा परिसरात खळबळ माजली आहे.
यरंडगांव येथील आशिष सुभाष भुरघाटे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये सदरची कारवाई करण्यात आली.
यवतमाळ वरुन आलेले सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था सावकारी पथक हे पराग सुरेश मामीडवार यांचे घराजवळ सकाळी 10.10 मिनिटाने पोहचले. तेथे सावकारी पथकाने तेथील इसमाला विचारले की, पराग सुरेश मामीडवार येथेच राहतात कां, मात्र गैरअर्जदार पराग मामीडवार हा तेथेच उपस्थित होता. या वेळी नोटीस देऊन घरझडती व राजेश्वर कृषी केंद्रांची झडती घेण्यात आली.
यात खरेदी खत, डायरी, विक्री पत्र, हस्तांतरण लेख, बॅकेचे बचत खाते पुस्तिका, व्यवहार असलेली डायरी असे 1 ते 7 कागदपत्रे जप्त करण्यात आले. जप्ती पंचनामा चे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.
जप्ती पंचनामा करते वेळी सावकारांचे निबंधक तथा घाटंजी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एस. व्ही. कुडमेथे, जप्ती पथकातील अधिकारी व कर्मचारी बाभुळगांव येथील सहाय्यक निबंधक तथा पथक प्रमुख व्ही. व्ही. रणमले, राळेगांव येथील सहाय्यक निबंधक के. टी. खटारे, स. अ. श्रेणी 1 – ओ. एम. पहुरकर, एस. डी. ठमके, कु. किरण वडते, कु. स्वाती राउत, कु. सोनाली थोरात, कु. संध्या पालकर, पंच सुर्यकिरण भगत, संतोष कैलासवार, पारवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, जमादार लखन राठोड, पोलीस शिपाई अमोल वाढई, महिला पोलिस शिपाई रंजना वाडगुरे व अभय बोबडे आदीं उपस्थित होते.