Home यवतमाळ माऊली मंगल कार्यालय अवैध बांधकाम प्रकरणी चौकशी अहवाल सादर

माऊली मंगल कार्यालय अवैध बांधकाम प्रकरणी चौकशी अहवाल सादर

38

मंडळ अधिकारी पांढरकवडा यांनी केली चौकशी ६ जूनला होणार सुनावणी

प्रतिनिधी पांढरकवडा

माऊली मंगल कार्यालय, रेस्टारंट, हॉटेल चे अवैध बांधकाम केल्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. पांढरकवडा शहरातील माऊली मंगल कार्यालय रेस्टारंट हॉटेलच्या मालकांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या मंगल कार्यालय, रेस्टारंट व हॉटेल इ. चे काम केलेले आहे. सदर जागेचा वापर त्यांनी वाणिज्यीक प्रयोजनार्थ सुरु केलेला असून मागील ५वर्षापासून शासनाकडे कोणतीही अकृषक आकारणी व रुपांतरीत कराची भरणा केलेला नसलेबाबत तक्रार माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी दाखल केली आहे या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करणे यांना निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानुसार मंडळाधिकारी पांढरकवडा यांनी प्रकरणात चौकशी करून कागदपत्रांसह अहवाल या कार्यालयास सादर केलेला आहे. दरम्यान आता मौजा पांढरकवडा येथील नझूल शिट नंबर ११बी मधील प्लॉट क्रमांक १३/१ अ क्षेत्र १४१००चौ.मी. चा प्लॉट व स्पायरीत बांधकामसह जागा आपण खरेदी दस्त क्रमांक १३८७/२०११ नुसार दिनांक २२/०८/२०११ रोजी खरेदी केलेले आहे. त्यानंतर आपण सदर जागेमध्ये माऊली मंगल कार्यालय रेस्टॉरंट, हॉटेल ई. में काम केलेले आहे. सदर जागेमध्ये आपण शासनाची परवानगी घेऊन वाणिज्य वापर सुरु केलेला आहे किंवा कसे? तसंच आपण सदर ठिकाणी वाणिज्य वापराबाबत सक्षम नियोजन प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे किंवा कसे या बाबत आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ६जून रोजी सकाळी ११वाजता तहसिल कार्यालय, केळापूर येथे उपस्थित रहा आपण सदर सुनावणी गैरहजर राहिल्यास प्रकरणात पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस संबंधित व्यक्तीला देण्यात आली आहे. असे तहसीलदार केळापूर यांनी कळविले आहे या सुनावणी मध्ये हयगय करणाऱ्या अधिकारी ची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केली आहे.