Home यवतमाळ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी राजेश मदने यांची तर संतोष...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी राजेश मदने यांची तर संतोष पवार यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड

27

राळेगाव :—- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यस्तराहून सुचविलेल्या नवीन बदलानुसार यवतमाळ जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची यवतमाळ जिल्हयाची आमसभा लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ येथे रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी संपन्न झाली. ही आमसभा प्रमोद भेंडे सर ‘राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची घोषणा प्रमोद भेंडे यांनी केली. सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी अध्यक्ष ताराचंद चव्हाण , सुधाकर काळे हे उपस्थित होते. यांनी यथोचित मार्गदर्शन केले.

◾ *नवीन कार्यकारणीची निवड*
जिल्हाध्यक्ष राजेश मदने यांची तर जिल्हा कार्यवाह संतोष पवार यांची निवड करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष बंडू काकडे , श्रीमती मीनाक्षी काळे ,जिल्हा सहकार्यवाह श्री सचिन जोशी ,जिल्हा कोषाध्यक्ष श्री सचिन देशपांडे ,जिल्हा संघटन मंत्री श्री संजय यवतकर
,जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ धनश्री धनंजय पांडे यांची निवड करण्यात आली. उर्वरित नियुक्त्या अध्यक्ष व कार्यवाह लवकरच घोषित करतील.
या सभेला सुधीर कानतोडे यवतमाळ , प्रफुल वऱ्हाटे मारेगाव,लक्ष्मण कानकाटे घाटंजी,नितीन येंबडवार, समृतवार सर राळेगाव, जीवन पळसोकर बाभुळगाव, श्री. सुधाकर काळे श्री भगत सर दारव्हा, श्री बल्की सर श्री गौरकार, श्री मोडक सर, श्री बंडु भाऊ काकडे, वणी, श्री जगताप , श्री मन्साराम सावलकर, अमित तिखीले, श्री ओम्रकाश कडु, श्री विकास वांदिले , श्री हेरंब पुंड, आदी पदाधिकारी उपस्थित होते . या सभेचे आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मदने यांनी केले….