Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील दिडशे गावात राबणार बालविवाह मुक्त अभियान…!

वर्धा जिल्ह्यातील दिडशे गावात राबणार बालविवाह मुक्त अभियान…!

54

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचा उपक्रम…!

वर्धा (प्रतिनिधी -योगेश काबंळे ) :- ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ संस्थेच्या वतिने यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात दिडशे गावात बालविवाह मुक्त गाव अभियान राबविण्यात येत असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देण्यात आले असून याची सुरवात करण्यात आली आहे.

या सोबतच शुन्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या सुरक्षेबाबत गावपातळीवर ग्रामपंचायत, गाव बालसंरक्षण समिती, किशोर वयीन बालक याचे सोबत कार्य करणार आहे.
वर्धा जिल्ह्य बालविवाह मुक्त करण्याचा संस्थेचा मानस असून त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते गावपातळीवर जाऊन गावपातळीवर उपलब्ध असलेली गाव बालसरंक्षण समितीच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन गावात अभियान राबविण्यात येणार आहे. सोबतच सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व गावातील सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना बालविवाह संदर्भात माहीती देऊन गावपातळीवर बालविवाह होऊ नये, आपले गाव बालविवाह मुक्त कसे राहील याबाबत संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ते यांचे कडून जनजागृती करून गावपातळीवर बैठका आयोजित करण्यात येत आहे. सोबतच महिला, युवक युवती तथा महिला बचत गटासोबत समन्वय साधून बालविवाह टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार आहे. बालविवाहापासून निर्माण होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात येवून बालविवाह रोखण्यासाठी संस्था कार्यरत रहणार आहे.
सोबतच तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांचेशी समन्वय साधून वेळप्रसंगी या अधिकाऱ्यांसोबत गावपातळीवर बैठक घेवून बालविवाह मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.