Home वाशिम मानोरा येथील पोलिस कर्मचारी लाच घेतांना अडकला एसिबिच्या जाळ्यात

मानोरा येथील पोलिस कर्मचारी लाच घेतांना अडकला एसिबिच्या जाळ्यात

111

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस स्टेशानच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारतांना वाशिमच्या लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.सदर कारवाई एसिबिचे गजानन शेळके यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.
एका गुन्ह्यात अटक न करता जमानत देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी या पोलीस कर्मचाऱ्याने केली होती. लाच स्विकारण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर मानोरा पोलीस स्टेशन परिसरातच लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारतांना पकडले.संजय कनिराम राठोड अस लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचारी नाव आहे.या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून यांचे विरुद्ध मानोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मानोरा पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार संजय राठोड ह्यांना 3000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक, ACB वाशिम चे DYSP गजानन शेळके, PI भोसले व पथकाची कारवाई, 4 महिन्यात वाशिम जिल्ह्यातील 4 पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई, अनसिंग, रिसोड, कारंजा व आता मानोरा पोलीस स्टेशन मध्ये यशस्वी कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ ऊडाली आहे.