Home विदर्भ पोलीस अधीक्षक “नुरुल हसन” शून्यातून विश्व निर्माण करणारा‌ एक प्रतिभावन्त

पोलीस अधीक्षक “नुरुल हसन” शून्यातून विश्व निर्माण करणारा‌ एक प्रतिभावन्त

81

वर्धा – शून्यावर शून्य….शून्य ….आणि शून्याच्या समोरच एक दिवस कष्टांच्या यशाचा आकडा उभा राहतो.मग तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने धनानेच नव्हे तर विचारानेही कोट्याधीश होते.

अशीच एक विचाराने गर्भश्रीमंत व्यक्ती वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक या पदावर आली आणि आपल्या सुसंस्कृत विचाराने त्यांनी तीन महिन्याच्या कार्यकाळात एक गतिमान प्रशासन कसे असते याचा वस्तुपाठच घालून दिला.
उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील हररायपुर या छोट्याशा गावी एका सामान्य गरीब व्यक्तीच्या घरी जन्म घेतलेल्या या व्यक्तीने शिक्षणाचे महत्व ओळखले आणि स्वतः शिकून उच्चशिक्षित अधिकारी तर झालाच पण छोट्या भावाला व बहिणीलाही शिक्षणाचे महत्व सांगून त्यांनाही उच्च शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहित केले.
तन, मन,बुद्धी एकत्रित खर्ची पडले की एक दिवस यशाचा सूर्य उगवतोच उगवतो.नुरुल हसन या तरुण तडफदार अधिकाऱ्याच्या बाबतीत असेच काहीसे घडले.
सामान्य आर्थिक परिस्थितीचा बागुलबुआ निर्माण न करता कष्टाने व जिद्दीने शिकून स्वतः आय पी एस होऊन भावा बहिणीतही शिक्षणाची जिद्द निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्याची जीवनगाथा काहीशी अशीच रोमहर्षक आहे.
मनी निस्पृह भाव जोपासणाऱ्या या अधिकाऱ्याने मेहनत व परिश्रमपूर्वक यश आपल्या दाराशी खेचून आणले.आज नुरुल हसन म्हणजे गुन्हेगारी विश्वासाठी एक कर्दनकाळ आहे तर सामान्य जनतेसाठी एक भाऊ!
अशा या जनप्रिय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी यासाठी त्याचे स्वागत करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या भावी कार्याला शुभकामना दिल्या.

#रुग्णमित्र_गजु_कुबडे
#वन्यजीवरक्षक_राकेश_झाडे
–————————————–
#शब्दांकन:- #सतीश_वखरे