मनिष गुडधे अमरावती
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात प्र. विभागीय आयुक्त षण्मुखराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस पथकाव्दारे यावेळी मानवंदना देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी राम लंके, सुभाष दळवी, आशिष बिजवल, रणजीत भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के, जिल्हा सुचना अधिकारी अरुण रणवीर, अधिक्षक उमेश खोडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी इमरान शेख, विद्यी अधिकारी नरेंद्र बोहरा, ना. तहसीलदार अरविंद माळवे, अंबादास काकडे, डेविड चव्हाण, नाझर किशोर चेडे आदी उपस्थित होते.