Home यवतमाळ Yavatmal – जिल्हा वकील संघाच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम संपन्न..!

Yavatmal – जिल्हा वकील संघाच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम संपन्न..!

135

( विनोद पत्रे )

—————-
यवतमाळ : जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांच्या वतीने रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन टिंबर भवनात करण्यात आले. सदर कार्यक्रमात यवतमाळ वकील संघाच्या वतीने बहुसंख्य वकील मित्र ईद मिलन कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
सदर ईद मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. हांडे साहेब हे होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य मा. ॲड. आशिष देशमुख, अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. डॉ. गौरी कवडीकर मॅडम, मा. लाहुळकर सर, मा. शर्मा मॅडम, मा. दुधे साहेब तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मा. हाश्मी सर, मा. मडके सर, मा. माळोदे मॅडम, मा. मेश्राम मॅडम, मा. मेंडे मॅडम, मा. मातकर मॅडम व इतर न्यायाधीश प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वरिष्ठ ॲड. एस. एम. अली यांनी कशाप्रकारे न्यायालयीन ईद मीलन कार्यक्रमाची सुरुवात केली व रमजान ईदचे महत्व काय ते समजावून सांगितले. तसेच ॲड. जयसिंग चव्हाण यांनी सुद्धा या प्रसंगी मार्गदर्शन केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. हांडे साहेब यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमांचे संचालन ॲड. पांडे मॅडम यांनी केले. आभार ॲड. विशाल श्रीवास यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी यवतमाळ बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललीत जैन, माजी अध्यक्ष ॲड. मिनाज मलनस आदींनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात सर्वांनी शिर खुर्माचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमाला यवतमाळ न्यायालयातील बहुसंख्य नामवंत, जेष्ठ, वरीष्ठ वकील आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.