Home औरंगाबाद औरंगाबाद बायको नांदायला येत नाही म्हणून पती चा राग अनावर झालं अन ,...

बायको नांदायला येत नाही म्हणून पती चा राग अनावर झालं अन , विपरितच घडलं ???

79

 

 

अमीन शाह

मन सुन्न करणारी,अंगावर शहारै आणणारी, ह्रदयद्रावक घटना औरंगाबाद येथील चौधरी कॉलनी येथे घडली असून पत्नी नांदायला येत नसल्यामुळे नाराज झालेल्या पतीने आपल्या दोन लहान चिमुकल्या मुलांना विहरित फेकून दिल्याची घटना घडली असून एका मुलास वाचविण्यात लोकांना यश आले आहे

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार आपल्या दोन चिमुकल्यांना घेउन बाहेर नेत ,काॅलनीच्या बाजुला असलेले गाजरे यांच्या मळ्यात,शेतातील विहीरीत ,दोन मुलांना टाकले ,”राजु प्रकाश भोसले ,वय 35 वर्षे अंदाजे ,याने नशेच्या ,आहारी जात ,श्रेयश वय 4 वर्षे, व शंभु वय 8 वर्षे या दोन चिमुकल्यांना विहीरीत टाकले ,बराच वेळ झाला शोधा शोध‌ सुरू झाली असता ,काही जणांनी गजरे यांच्या मळ्यात त्याला जाताना बघितले होते काही लोकांनी तिकडे जावुन बघितले असता हा गँभीर प्रकार समोर आला जिवाची बाजी लावत ” अनिरूद्ध दहिहंडे ‘” या तरुणाने, विहीरीत उडी घेत , दोन्ही चिमुकल्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले ,श्रेयस वय 4 हा मयत झाला असुन शंभु वय 8 याला वाचवण्यात आले आहे ,” घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी या निर्दयी बापाला अटक केली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत ,घडलेल्या घटने मुळे परिसरात हळहळ व्यकत केली जात आहे ,