Home यवतमाळ आम आदमी पार्टी चा भारत देशात झपाट्याने प्रसार…!

आम आदमी पार्टी चा भारत देशात झपाट्याने प्रसार…!

84

यवतमाळ – आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये सरकार बनवण्यात यशस्वी झाली असून पार्टी ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. पार्टी चे महाराष्ट्राचे संयोजक रंगाभाऊ राचुरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पार्टी चा पाया मजबूत होत आहे. आज बुधवार दि 19/04/2023 रोजी महाष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ तालुका स्तरावरील ग्राम पातळीवरील पारवा, तळेगाव ( भारी ), खानगाव, कार्ली, शरद या पाच गावी शाखा उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम यवतमाळ तालुका संयोजक श्री मोबीन शेख यांच्या नेतृत्वात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित असलेले आम आदमी पार्टी चे पश्चिम विदर्भाचे सहसंयोजक श्री भाई अमन यांच्या हस्ते शाखा उदघाट्नाचे शुभ काम करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्ह्याच्या महिला संयोजक सौ सुनंदाताई साखरकर, यवतमाळ शहर संयोजक श्री गुणवंतराव इंदूरकर, यवतमाळ जिल्हा कोषाध्यक्ष विलासराव वाडे, डॉ. गणेश नाईक, यवतमाळ तालुका सहसंयोजक फजरूल खान, यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर, तालुका महिला सचिव अरेफा खान, तालुका आदिवासी समाज प्रमुख बाबाराव कुमरे, तालुका युवा संयोजक नजूल सोयाम, तालुका सदस्य विनोद जामकर, सुभाष पाडसेनेकून, शहर संघटक गोपाल गावंडे, शहर आदिवासी समाज प्रमुख शत्रुघनजी आडे, युवा आघाडीचे जिल्हा संयोजक आकाश चमेडिया, युवा आघाडीचे सहसचिव जावेद शेख, श्री अविनाशजी धनेवार, नितीन मंत्रिवार, अमोल भोयर, प्रफुल तोडासे, विक्की शेंडे, आकाश शेंडे, आकाश शिवारे, कांताताई मेश्राम, वर्षा रामटेके, विलास वाळके, प्रकाश मेश्राम हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.