Home सोलापुर वेळापूर – पिसेवाडी जवळ अपघात…

वेळापूर – पिसेवाडी जवळ अपघात…

81
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०२ :- वेळापूर जवळ मोठा अपघात . वैराग येथील फलफले कुटूंबातील ६ जण ठार वेळापूरजवळ शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टँकर व कारचा अपघात झाला आहे .

सहाजण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत . मृत्यू झालेले सर्व वैराग ( ता . बार्शी ) येथील आहेत . वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते . मात्र , वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे .

वेळापूर – पिसेवाडी जवळ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना गट सेंटर समोर पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली . या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे . या अपघातात कारमधील सहाजणांचा जागीच मृत्यु झाला . यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे . अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत .

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत . मृतांना शवविच्छेदनासाठी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे . दोन जखमींवर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत . ट्रक वाहन चालक व वाहक पसार झाले आहेत .