
- ♦
🔹प्रसाद मडगांवकर 🔹
🔸रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत झालेल्या वाढीसंदर्भात पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना लेखी निवेदन देत, शासनाचे या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले आहे.
🔹निर्भिड पत्रकार शशिकांत वारिसे यांची झालेली निर्घृण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
🔸 याबरोबरच पुरोगामी महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत असून, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, यासाठी ‘पत्रकार संरक्षण कायद्याची’ कडकपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांकडून अप्पर जिल्हाधिकारी श्री शंकर बर्गे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
🔹यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद भास्कर मडगांवकर, जिल्हा सचिव श्री. शैलेश सुदाम मयेकर खजिनदार श्री. वासुदेव उर्फ नयनेश प्रभाकर गावडे, जिल्हा संघटक श्री. जाफर याकूब शेख, उपजिल्हाध्यक्ष श्री. संजय सखाराम पिळणकर, सहसचिव श्री. मदन शंकर मुरकर, सहखाजिनदार श्री. यशवंत कृष्णा माधव आदी समितीचे सभासद प्रतिनिधी उपस्थित होते.