Home महाराष्ट्र उठ पञकार जागा हो , पञकार शशिकांत वारीशेचा धागा हो…!

उठ पञकार जागा हो , पञकार शशिकांत वारीशेचा धागा हो…!

77
0

रत्नागिरी: कोकणातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे याचा अपघात घडवून हत्या करणारा संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर याच्यावर खुनाचा गुन्हा तसेच पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रिफायनरी समर्थक असलेला पंढरीनाथ आंबेरकर याचा पूर्व इतिहासही दबंगगिरीचाच असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आता पोलीस तपासात पुढे आली आहे. काल छातीत दुखत आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याची रवानगी पुन्हा आज शुक्रवारी कोठडीत करण्यात आली. दरम्यान या सगळ्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील आज सगळे पत्रकार सगळ्या जिल्हयात व तालुक्यात एकत्र आले होते. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या संघटनांनी घेतली आहे.

एप्रिल २०१० मध्ये राजापूरच्या कुंभावडे गावचे सरपंचांचा मुलगा असणाऱ्या मनोज मयेकर यांच्यावर हल्ला झाला होता. मनोज मयेकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. मनोज मयेकर आणि पंढरीनाथ आंबेरकर एकाच गावात राहायला होते. मनोज मयेकर यांनाही पंढरीनाथ आंबेरकर यांच्या गाडीने धडक दिली होती. यानंतर मनोज मयेकर यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकरला अटक केली होती. पण नंतर आंबेरकरला याप्रकरणात जामीन मंजूर झाल्याने तो तुरुंगाबाहेर आला होता.

याशिवाय,जिल्ह्यातील एका नेत्याच्या विरोधात रिफायनरी विरोधक संघटनेच्या सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर आंबेरकर आणि काही जणांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राजापूर कोर्टाच्या आवारामध्ये नरेंद्र जोशी या रिफायनरी विरोधकांच्या नेत्यावर हल्ला केला. या प्रकरणी संशयित आंबेरकर याच्या विरोधात राजापूर नाटे पोलीस स्टेशन येथे कलम १४३, १४६, १४७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

तर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशन हद्दीत अश्विनी अशोक वालम यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी १४ जानेवारी २०१८ रोजी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी वालम या कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासह काही महिला एकत्र आल्या होत्या. त्यावेळीही शिवीगाळ करण्यात आली आणि अशोक वालम यांना मारण्याची धमकी देण्यात आली, असा उल्लेख या ‘एफआयआर’मध्ये करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Previous articleवाहन जाळल्याप्रकरणी ८ आरोपींना अटक ; तर जनावरांच्या हाडांची अवैधपणे वाहतूक केल्याप्रकरणी वाहनचालक व मालकावर गुन्हा दाखल
Next articleमहाशिवरात्र निमित्ताने कौलाळे पांडवकाली शिव मंदिर येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह आयोजन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here