Home बुलडाणा देऊळगावराजा येथे उद्या कवी संमेलन

देऊळगावराजा येथे उद्या कवी संमेलन

43

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगावराजा:- मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त नगर पालिका आणि श्री शिवाजी हायस्कूलच्या वतीने शहरात मंगळवारी, दि. २४ जानेवारी रोजी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता या कवी संमेलनाचे उद्घाटन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. भगवान खरात राहणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. ललित अधाने राहणार आहेत. याप्रसंगी औरंगाबाद येथील कवी डॉ. विष्णू सुरासे, मेहकर येथील डॉ. सुनील पवार, देऊळगावराजा येथील प्रा. मधुकर जाधव, विघ्ने, शारदा दराडे, सिंदखेडराजा येथील बिस्मिल्ला सोनोशी व अँड. वर्षा कंकाळ राहणार आहेत. या कवी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आहे.