Home महत्वाची बातमी चक्क दहा हजार रुपये साठी जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात मुलीची केली विक्री…!

चक्क दहा हजार रुपये साठी जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात मुलीची केली विक्री…!

27
0

अमीन शाह

माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुंबईत उघडकीस आली आहे. जिथे जन्मदात्या आईनेच पैशापायी आपल्या 15 दिवसांच्या नवजात चिमुरडीची वेश्या व्यवसायासाठी विक्री केली. आरोपीने बिहारमधून या नवजात बालकाची तस्करी करुन मुंबईत विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. यात 2 वेश्या दलाल महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. आपल्या तान्हुलीची विक्री करणारी महिला बिहारमध्ये राहणारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेश्या व्यवसायात आणण्यासाठी हे आरोपी नवजात बालकाची बिहारमधून तस्करी करून मुंबईत आणत आणि त्यांची विक्री कुंटन खान्यात करत होते. बांद्रा पश्चिम येथील कुरेशी नगरमध्ये काही व्यक्ती नवजात बालकाला घेऊन वेश्या व्यवसायात विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक केली.
बिहारमधील एका महिलेने या बाळाला जन्म दिल्यानंतर केवळ 10,000 रुपयांना चिमुकलीला विकले. मुलीचा सौदा केल्यानंतर तिला कुरेशी नगर येथे आणण्यात आले होते. याच ठिकाणी तिची वाढ करून त्यानंतर तिला वेश्याव्यवसाय ढकलण्यात येणार होते यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करीत असून या टोळीमध्ये आणखीन किती जण संलग्न आहेत याचा शोध घेतला जात आहे.
पैसा हा आयुष्यात इतका महत्त्वाचा झाला आहे की या निष्ठूर आईने जराही तमा न बाळगता आपल्या तान्हुलीची विक्री केली. या आईच्या वागण्याला काय म्हणावे? मुळात तिला आई तरी म्हणावे का ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

Unlimited Reseller Hosting