Home विदर्भ पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन…!

पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन…!

191

“ना जातीसाठी, ना मातीसाठी” लढाई ‌फक्त पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठ

वर्धा /  आर्वी : आज शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता वाजता विश्राम गृह आर्वी येथे पत्रकार संरक्षण समितीची आर्वी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठक पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात येत असून या बैठकीमध्ये पत्रकारांच्या समस्या, सूचना घेण्यात येणार आहे. तसेच तालुका कार्यकारीणी नव्याने गठीत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मा रविराज घुमे (विदर्भ उपाध्यक्ष), मा. सत्तारभाई शेख (कार्याध्यक्ष), मा.बाळाभाऊ चतारे (जिल्हाध्यक्ष), मा. संदिप रघाटाटे (ग्रामीण जिल्हाध्यक्ष), मा. योगेश कांबळे (जिल्हासचिव) मा.प्रशांत आजनकर (जिल्हा संघटक), मा. इकबाल शेख (जिल्हा सहसचिव) मा. प्रमोद भोजने (जिल्हा कोषाध्यक्ष), मा. प्रविण करोले व मा. अमोल सोटे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
त्या करीता ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बंधूंनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून नव्याने पत्रकार संरक्षण समितीच्या कार्यकारीणीच्या निवडीच्या प्रक्रियेत भाग घ्यावा. नव्याने पत्रकार संरक्षण समितीच्या सदस्य नोंदणीचा फार्म भरणार आहे. पत्रकारांना संघटनेचे ओळखपत्र आपण पत्रकार दिनी कार्यक्रमात वाटप करणार आहोत. सदस्य फार्म बैठकीत उपलब्ध राहील. सदस्य नोदंणी फी 300 रुपये सोबत आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स ,दोन पासपोर्ट फोटो तसेच पत्रकार असल्याबाबत पुरावा जसे ओळखपत्र किंवा आपण करीत असलेल्या वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधी यांचे पत्र सोबत आणावेत. या बैठकीमध्ये स्नेहभोजन मिटिंग नंतर लगेचच राहील. हि बैठक राजेश सोळंकी, आर्वी तालुका अध्यक्ष,विनोद महाजन वर्धा जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित केली आहे.