Home मुंबई आमची सर्व पक्षातील नेत्यांना विनंती आहे की कृपया छत्रपती शिवाजी महाराज यांचे...

आमची सर्व पक्षातील नेत्यांना विनंती आहे की कृपया छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत वादग्रस्त विधाने करू नये.

90
0

सुभाष तळेकर (अध्यक्ष  )मुंबई डबेवाला असोशिएशन

मुंबई ( प्रतिनिधी )
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत कोणी ना कोणी सतत वादग्रस्त विधान करत आहे. त्या वादग्रस्त विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी अशी वादग्रस्त विधान करू नये. त्यांने आम्ही दुखावले जातो. कारण डबेवाले मुळचे मावळे आहोत पुणे जिल्यातील चोवीस मावळातून आम्ही कामासाठी मुंबईत आलो आहोत.
एक काळ असा होता आमच्या हातात ढाल होती तलवार होती आम्ही गड किल्ले चढत होतो, गड जिंकत होतो.. आता आमच्या हातात जेवणाचा डबा आहे व दादर आणी शिड्या चढून आम्ही तो डबा पोहचवतो. आमचे पुर्वज स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले आमच्या घरादाराची राखरांगोळी झाली, गावा वरून गाढवाचे नांगर फिरले तरी आम्ही डगमगलो नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव होते, आणी दैवताच्या नुसत्या इशाऱ्यांवर हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही गणिमांशी झुंजत होतो. आमच्या दैवता बाबत चुकीचे वक्तव्य कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.
महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या महाराष्ट्रविरोधी लोकांविरुद्ध महाविकास आघाडीने विशाल मोर्च्याची घोषणा केली आहे. १७ डिसेंबर २०२२ रोजी हा विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला “ मुंबई डबेवाला असोशिएशन “ चा पाठिंबा आहे. मुंबई डबेवाला असोशिएशन चे पदाधिकारी मोर्चात सहभागी होतील.
आमची सर्व पक्षातील नेत्यांना विनंती आहे की कृपया छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत वादग्रस्त विधाने करू नये.
या बाबत चे पत्र आज नरेंद्र राणे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॅाग्रेस मुंबई यांना राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात प्रत्यक्ष भेटून दिले ..

Previous articleतीन लेकरांच्या आईचा आत्या भावा बरोबर सूत जुळला अन , विपरितच घडलं ?
Next articleमैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या प्रयत्नाला यश,परतावा मिळण्याच्या हालचालींना मिळाली‌ दिशा…
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here