Home यवतमाळ बाळासाहेबांची शिवसेना’ ,संपर्क प्रमुखपदी हरिहर लिंगनवार निष्ठावान कार्यकर्त्याच्या परिश्रमाची दखल…!

बाळासाहेबांची शिवसेना’ ,संपर्क प्रमुखपदी हरिहर लिंगनवार निष्ठावान कार्यकर्त्याच्या परिश्रमाची दखल…!

168

यवतमाळ – ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आज शुक्रवारी घोषित करण्यात आली. यात यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून तत्कालीन शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे विश्वासू सहकारी हरिहर लिंगनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिंगनवार यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करून पक्षाने एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या परिश्रमाची दखल घेतल्याची चर्चा पक्षात आहे.

हरिहर लिंगनवार यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन वाढीसोबतच भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. हरिहर लिंगनवार हे पांढरकवडा तालुक्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. संजय राठोड यांच्या सामाजिक, राजकीय कार्यक्रमांच्या नियोजनात लिंगनवार यांचा मोलाचा सहभाग असतो. लिंगनवार यांच्याकडे प्रश्नांना थेट भिडण्याची वृत्ती आणि प्रशासनाकडून काम करवून घेण्याची हातोटी असल्याने जिल्ह्यात असंख्य कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी विणले आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची सहजवृत्ती असल्याने संपर्कप्रमुख म्हणून लिंगनवार हे पक्षाला जिल्ह्यात अधिक बळकट करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांना देतात. त्यांच्या या निवडीबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.