Home महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हास्तरीय हॉलीबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी “विजेता संघ...

यवतमाळ जिल्हास्तरीय हॉलीबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी “विजेता संघ 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या हॉलीबॉल विभागीय स्पर्धेस पात्र”

103

यवतमाळ / राळेगाव :– यवतमाळ जिल्हा स्तरीय 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या हॉलीबॉल मैदानी स्पर्धा नेहरू क्रीडागण यवतमाळ येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी पार पडली यामध्ये राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 14 वर्ष वयोगटातील मुलांचा विद्यार्थीचा संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत विजेता ठरला यामध्ये शाळेतील जिल्हास्तर विजयी संघात खेळाडूं म्हणून सुजल कांबळे,

संविधान हिवरकर, वेदांत बोदडे,मंथन ठाकरे,नयन पेन्दोर,
आर्यन मलमकर, लकी राऊत, यश वनकर,नैतिक चौधरी ,जयकांत शिखरे,ओम कोसुळकर, निसर्ग ताकसांडे हे विद्यार्थी सहभागी होते. तर विजेता संघ कारंजा लाड येथील विभागीय हॉलिबॉल स्पर्धेस पात्र ठरल्या मुळे विजेत्यां संघातील खेडाळूवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.सदर विजेत्यां संघाला शाळेतील क्रीडा शिक्षक विजय कचरे,किशोर उईके, सूचित बेहरे,यांनी मार्गदर्शन केले असून विजेत्यां संघाचे जिल्हा क्रीडाअधिकारी यवतमाळ , न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…..