Home विदर्भ जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

169

अमरावती – आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा दिवस विविधकार्यक्रमाने सार्वत्रिक साजरा केल्या जातो. समान संधी, हक्काचेसंरक्षण, संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 दिव्यांग कायदा करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येवून1 6 डिसेंबर 2016 मध्ये भारतीय संसदेने दिव्यांगाच्याह क्कासाठी कायदा तयार केला.

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 संसदेच्या या कायद्यास 27 डिसेंबर 2016 रोजी मा. राष्ट्रपती यांचेकडून मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार शासनानेदिव्यांगासाठी अनेक सोयीसवलती लागु केल्या , शासननिर्णय काढले शासन निर्णयानुसार वरीष्ठ अधिकारीआदेशसुद्धा काढतात. परंतु अमलबजावणीबाबत नंतर आढावा घेतला जात नाही. संबंधित विभाग त्या योजनेची प्रभावी अमलबजावणी करतांना दिसत नाही. परीणामत:हात्यामुळे त्या योजनेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहतात. दिव्यांगाना अपमानास्पद बोलणे त्रास देणे, अन्याय करणे, अतिरिक्त काम देणे यासारखे अनेक प्रकार होतांना दिसतात. दिव्यांग व्यक्तींना त्रास देणार्‍या अथवा त्यांना त्यांच्या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या वर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण तसे होतांना दिसत नाही. आजही दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संघटना, संस्था
यांना दिव्यांगाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते , आंदोलन करावे लागते हे दुर्दैवच आहे.
– दिव्यांग असुनही आमचा दिव्यांग बांधव धडधाकट
व्यक्तीपेक्षा कूठेच कमी नाही जिद्द चिकाटी असेल तर यशाचे शिखर गाठता येते हे आमच्याअनेक दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्वावर मात करून दाखवून दिले. त्यांना सहानुभूती नको त्यांना हवे त्यांचे हक्क प्रशासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यांचेकरीता असलेल्या योजनेचा लाभ हा तळागाळातील दिव्यांग व्यक्तींना मिळालाच पहीजे तरच खऱ्या अर्थाने जागतिक दिव्यांग दिन साजरा केल्यासारखे होईल.
त्याकरीता दिव्यांगासाठी कामकरणाऱ्या संघटनाना एकत्र येऊन
संघटनेच्या माध्यमातून लढा उभारावा लागेल.
या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बंधू भगीनींना
जागतिक दिव्यांग दिनाच्या
मनपूर्वक शुभेच्छा!
राजेंद्र देशमुख
( जिल्हाध्यक्ष )
राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ
जिल्हाशाखा अमरावती