Home विदर्भ 1 डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंध दिन

1 डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंध दिन

126

अमरावती – एड्स म्हणजे कुठला हि आजार किंवा रोग नाहीये. एड्स ज्याला होतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हळूहळू इतके रोग तयार होतात कि त्याचे शरीर रोगाचे माहेरघर बनते. आणि त्या व्यक्तीला मरणाची वाट बघण्या पलीकडे दुसरं काहीही करता येत नाही. सध्या मार्केट मध्ये काही औषध उपलब्ध आहेत. त्या औषधांचा वापर करून त्याला होत असणारा त्रास कमी करता येतो. पण एचआयव्ही बरा करता येईल अशी औषध उपलब्ध झालेलं नाहीत. आणि त्याच्यावर काही इलाज हि करता येत नाही.
एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये सुरुवातीला कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत पण काही लोकांमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सहसा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांत दिसू लागतात तर काही लोकांमध्ये लक्षणं दोन आठवड्यांच्या आधीच दिसू लागतात. ताप, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, सुजलेल्या ग्रंथी, घसा खवखवणे, स्नायूंमध्ये वेदना, सांधेदुखी, रात्री घाम येणे, अतिसार ही एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे आहेत. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ही एचआयव्हीची लक्षणे सामान्य आजार आणि इतर आरोग्य स्थितींशीही संबंधित आहेत.
एचआयव्ही वायरस ने जर मानवी शरीरात प्रवेश केला तर त्या व्यक्तीला एड्स होतो. हा विषाणू मानवी शरीरात गेल्यानंतर ६ महिने ते १० वर्ष कालावधीत कधीही त्या व्यक्तीला एड्स होऊ शकतो. मुळातच एड्स झालेल्या व्यक्तीकडे जेव्हा आपण पहातो तेव्हा नकळत आपल्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. त्याचे कारणही तसेच आहे. हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे एड्सच्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते.
यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे एचआयव्ही होऊ नये म्हणून काळजी घेणे. मुख्य म्हणजे या आजारावर रामबाण औषध अथवा लस उपलब्ध नाही, म्हणून प्रतिबंध हाच उत्तम मार्ग होय. ‍हा आजार बर्‍याच अंशी माणसाच्या जोखीमपूर्ण वागणूकीशी किंवा मानसिकतेशी निगडीत असल्याने तो टाळता येणे सहज शक्य आहे.

*डॉ.अजय डवले*
*प्राचार्य*
*आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र*
*अमरावती*