Home जळगाव काका ने केला पुतणयाचा खून…!

काका ने केला पुतणयाचा खून…!

40
0

पाचोरा:{आनंद पाटील} जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतण्याचा बैल शेतात आल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केले. यामध्ये ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जळगाव येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असतांना बुधवारी त्याचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत काकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील वाडी, शेवाळे, ता.पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात घूसल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने मारले. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल घुसल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसले ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान किरण खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleमंत्रालय येथे दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विर्दभ प्रदेश प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न
Next articleरुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here