विदर्भ

बस थांब्यावर मैत्रिणींसमोर छेड काढल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या,वडाळी ता.मेहकर येथील आरोपी विरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल

अमीन शाह

बुलडाणा , दि. ३१ :- मैत्रिणींसमोर छेड काढल्याने त्याचा अपमान सहन न झाल्याने 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडाळी तालुका मेहकर येथे गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी घडली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी नातेवाईक प्रेत घेऊन जानेफळ पोलीस स्टेशनला पोहचल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्या सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वडाळी येथे त्या विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की वडाळी तालुका मेहकर येथील 16 वर्षीय तरुणी उंद्री तालुका चिखली येथील शिवाजी हायस्कूल मध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षणासाठी दररोज अप-डाऊन करीत असतांंना काल दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी सराव परीक्षेचा पेपर देऊन घरी परत जाण्यासाठी सकाळी 10:30 वाजेदरम्यान उंद्री तालुका चिखली येथील बस थांब्यावर मैत्रिणी समवेत एस टी बसची वाट पाहत उभी असतांंना तेथे महादेव सीताराम देवकर वय 22 वर्ष राहणार वडाळी तालुका मेहकर याने मोटर सायकल घेऊन जात तिला ‘चाल माझ्या गाडीवर बस मी तुला घरी सोडून देतो’ असे म्हटले त्यामुळे मैत्रिणींसमोर अपमान झाल्याचे सहन न झाल्यामुळे तिने घरी पोहोचल्यानंतर आपल्या आजोबांना सदर प्रकार सांगितला असता तिचे आजोबा हे महादेव सीताराम देवकर याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असतांंना त्या शालेय विद्यार्थिनीने घराचा दरवाजा बंद करीत घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजोबा घरी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा बंद दिसल्याने तो उघडण्यासाठी आवाज दिला परंतु घरातून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता त्यांना आपली नात गळफास घेतलेल्या आवस्थेत लटकलेली आढळून आली त्यामुळे त्यांनी आरडाओरड करताच शेजारील सर्वच लोक धावत आले आणि त्यांनी त्या विद्यार्थिनीला प्रथम उंद्री येथील रुग्णालयात व तेथून चिखली येथे उपचारार्थ हलविले असतांंना तेथे मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे चिखली येथे तिच्या प्रेताचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत वडाळी येथे घेऊन जात असतांना पोलिसात तक्रार देण्यासाठी जानेफळ येथे आलेल्या तिच्या आजोबांंना सोबत घेऊन जाण्यासाठी सर्व नातेवाईक प्रेतासह जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांना याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाच गुन्हा दाखल केल्याची माहिती समजल्याने त्यांनी रोष व्यक्त करीत आरोपीविरुद्ध तात्काळ बाललैंगिक विरोधी कायदा तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे ठाणेदार दिलीप मसराम यांनी वरिष्ठांशी संपर्क करीत चर्चा केल्यानंतर सदर विद्यार्थिनीच्या वडिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आले व त्यावरून बाल लैंगिक विरोधी कायदा तसेच ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट नुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले.

यामुळे समाधान झाल्यानंतर विद्यार्थिनीचे प्रेत घेऊन नातेवाईक वडाळी येथे रवाना झाले व रात्री उशिरा वडाळी तालुका मेहकर येथे अंत्यसंस्कार पार पडले.
सदर घटनेमुळे शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अशा घटनांना आळा बसण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ पावले उचलण्याची मागणी होत आहे .

You may also like

विदर्भ

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या ...
विदर्भ

राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसिलदार भगवंत कांबळे यांचा सत्कार,  ‘उपजिल्हाधिकारी पदी बढती,राज्यभरातून अभिनंदन”

धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...