Home यवतमाळ सेवानिवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी, तक्षशिला गजभिये, संजय इंगळे व ओमप्रकाश...

सेवानिवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी, तक्षशिला गजभिये, संजय इंगळे व ओमप्रकाश भौंड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर केळापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी सुनावणी..!

297

विनोद पत्रे 

यवतमाळ, 15 नोव्हेंबर – आपसी संगनमत करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी झरी जामणी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बी. एस. वाढई यांच्या आदेशावरून संशयीत आरोपी पी. एम. नंद (55 अकोला), सुनिल शत्रुघ्न मिश्रा (52 नागपूर), राजेंद्रगिर हिरागीर गोसावी (55 यवतमाळ), तक्षशिला नरेंद्र गजभिये (35 यवतमाळ), संजय काशिराम इंगळे (42 यवतमाळ), ओमप्रकाश शेरसिंग भौंड (38 यवतमाळ), अंजली नगरकर (45 नागपूर), जिग्नेश गुणवंत गोपाणी (32 मुंबई) आदीं विरुद्ध भादंवि कलम 420, 468, 470, 471 अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात घाटंजी तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीचे माजी अध्यक्ष तथा कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांचेमार्फत ॲड. रंजित अगमे, ॲड. आर. एम. बोथले यांनी झरी जामणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपी सेवानिवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी, ज्युनिअर जिओलाॅजीष्ट तक्षशिला गजभिये, सहाय्यक जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय इंगळे व तत्कालीन जिल्हा खनिकर्म अधिकारी ओमप्रकाश भौंड आदींनी पांढरकवडा येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नायकवाड यांच्या न्यायालयात यवतमाळचे ॲड. राजेश साबळे व ॲड. राशेद शेख यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सदरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (19 नोव्हेंबर 2022) सुनावणी ठेवण्यात आली आहे. तथापि, सदर प्रकरणातील तक्रारदार/फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांनी केळापूर न्यायालयात आक्षेप (OBJECTION) अर्ज दाखल करुन पुराव्याकामी महत्वाचे दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहे. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रशांत मानकर हे काम पाहत आहे. सदर प्रकरणात मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान तपास करत असुन दुय्यम निबंधक झरी जामणी व महसुल विभागाकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज मुकुटबन पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजै – अडेगांव येथै शासनाची भोगवटदार वर्ग 2 वन विभागाच्या मालकीची शेतजमीन आहे. गट नंबर 795 क्षेत्रफळ 137 हेक्टर 60 आर ही शेतजमीन “राखीव वन अ वर्गाची” असुन पैकी 24 हेक्टर 87 आर शेतजमीन पी. एम. नंद यांच्या नावाने जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगिर गोसावी, तक्षशिला गजभिये व संजय इंगळे आदींनी संगनमत करुन शासनाची फसवणुक करुन बेकायदेशीर रित्या 13 एप्रिल 2017 रोजी भाडे तत्वावर लिहून दिली होती. या बाबत सदर प्रकरणात कायदेशीर त्रुटी दुर करण्याकरिता 6 सप्टेंबर 2018 रोजी चुकीचा दुरुस्ती लेख जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडुन लिहून देण्यात आला.

वास्तविक पाहता, या बाबत केंद्र शासनाने 11 जानेवारी 2017 नंतर लिज जमीनीबाबत कोणत्याही प्रकारचा करारनामा करुन देण्याबाबत माईनिंग लिज Rules 8 (4) of MCR 2016 या द्वारे बंदी घातलेली होती. असे असतांना सुद्धा गैरअर्जदार राजेंद्रगिर गोसावी, तक्षशिला गजभिये व संजय इंगळे यांनी गैरकायदेशीर रित्या 13 एप्रिल 2017 रोजी शासन, वने व पर्यावरण विभाग व इतर विभागाकडुन कोणतीही परवानगी न घेता खनिज पट्टा लिज करारनामा लिहुन दिला. त्यामुळे आरोपींनी शासनाची फसवणुक करुन लाखो रुपयाचे नुकसान केले आहे.

त्यामुळे सदर प्रकरणात घाटंजी तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीचे माजी अध्यक्ष व कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी ८ ऑगस्ट रोजी मुकूटबन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांविरुद गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, दखलपात्र गुन्हा असतांना सुद्धा गुन्हा नोंद न करण्यात आल्याने 12 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे लेखी तक्रार नोंदवली. तरीही एफआयआर नोंद न झाल्याने अखेर 15 सप्टेंबर रोजी झरी जामणी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बी. एस. वाढई यांच्या न्यायालयात किरकोळ फौजदारी अर्ज 82/2022 दाखल केला. विशेष म्हणजे संबंधित आरोपींनी केळापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी 19 नोव्हेंबर 2022 रोजी सुनावणी होणार आहे.

सदर प्रकरणात मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान हे तपास करीत आहे.