Home यवतमाळ घाटंजी पोलीस ठाण्यात जिर्ण अवस्थेत असलेल्या दुचाकी व तिन चाकी वाहनांचा 22...

घाटंजी पोलीस ठाण्यात जिर्ण अवस्थेत असलेल्या दुचाकी व तिन चाकी वाहनांचा 22 नोव्हेंबर रोजी लिलाव..!

174

 

➡️ लिलावात जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घेण्याचे घाटंजी ठाणेदार मनिष दिवटे यांचे आवाहन.!

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी – पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधीकारी यासीनी नटराजन यांचे आदेश क्रमांक/उविदंके/अका/संदर्भ/कावी/773/2022 दि. 28/6/2022 प्रमाणे पोलीस स्टेशन घाटंजी च्या आवारात पडुन असलेल्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या 47 दुचाकी, तिनचाकी वाहनांचा लिलाव करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे.

सदर वाहनांचे मुल्यांकन ARTO यवतमाळ यांचेकडुन करुन घेण्यात आल्याने लिलाव प्रक्रीयेचा मार्ग खुला झाला आहे. त्याप्रमाणे सदर 47 जिर्ण वाहनांचा लिलाव 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता पोलीस स्टेशन घाटंजीचे प्रांगणात ठेवण्यात आला आहे.

सदर वाहने अतिशय जिर्ण असल्याने व दुरुस्ती होण्यायोग्य व चालविण्या योग्य नसल्याने तसेच प्रत्येक गाडीचा वेगवेगळा लिलाव हा वेळखावु असल्याने संपुर्ण 47 वाहनांची एकच बोली लावण्याचे धोरण निच्छीत करण्यात आले आहे.
सदर वाहनांची मोडतोड करुन विक्री करण्यात येईल जेणेकरुन त्या वाहनांचा नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर व इंजिन नंबरचा गुन्हेगारी साठी पुन्हा वापर होणार नाही असे लिहुन द्यावे लागेल.
वरील अटी मान्य असणाऱ्या ज्या ईच्छुक व्यक्तींना 47 गाड्यांची एकत्रित बोली लावायची असेल त्यांनी सदर लिलावाचे दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी 10.30 वाजता घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात हजर राहावे, असे आवाहन घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांनी केले आहे.

घाटंजी पोलीस स्टेशन मधील जिर्ण अवस्थेत असलेल्या दुचाकी व तिन चाकी वाहनाचा लिलाव करण्याचे आदेश पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यासीनी नटराजन यांनी घाटंजी पोलीसांना दिले आहे.