Home मुंबई हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

45
0

 

मुंबई – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ आयोजकांनी रहित केल्याचे जाहीर केले. हा संघटित हिंदूंच्या सनदशीर मार्गाने केलेल्या प्रतिकाराचा विजय आहे. हा केवळ आरंभ आहे, देशातील ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली. समितीच्या या यशाबद्दल श्री. घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञताही व्यक्त केली.

मरीन ड्राईव्ह येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला.
‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती. ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैशाचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी देशांत हलाल प्रमाणपत्र आणि हलाल वस्तू यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे भारतातही हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘जमियत उलेमा-ए-हिन्द हलाल ट्रस्ट’ ने मुंबईतील ‘२६/११’चा बाँबस्फोट, झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीदीमधील बाँबस्फोट, पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट आदी अनेक आतंकवादी कारवायांतील आरोपींना कायदेविषयक साहाय्य करत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ अशा विविध आतंकवादी संघटनांशी संबंधित सुमारे ७०० संशयित आरोपींच्या खटल्यांना आर्थिक साहाय्य केले जात आहे. भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय संस्था ‘FSSAI’ आणि ‘FDA’ अर्थात राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ हे विभाग असतांना हिंदुबहुल भारतात वेगळ्या ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती कशासाठी ? त्यामुळे ‘हलाल उत्पादनां’चे उदात्तीकरण करणार्‍या कार्यक्रमांना पोलीस-प्रशासनाने अनुमतीच देऊ नये, अशी मागणी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी केली.

Previous articleदेऊरवाडी(लाड) येथे काकड आरती समाप्ती
Next articleपर्यावरण सेवा रक्षणाचा यवतमाळकर संस्थांचा संकल्प
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here