Home नांदेड सारखणी येथे सिंदखेड पोलिसांची नाका बंदी.

सारखणी येथे सिंदखेड पोलिसांची नाका बंदी.

92
0

प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

नांदेड/सारखणी,दि,०५ :- सिंदखेड पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या सारखणी येथे मुख्य रस्त्यावर वसंतराव नाईक चौकात,माहूर रोड, मांडवी रोड, किनवट रोडवर नाका बंदी करून दुचाकी,चार चाकी ,आटो, टेम्पो,ट्रक या गाड्यांची कागदपत्र तपासणी करण्यात आली.दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने सिंदखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सिंदखेड पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या सारखणी येथे सायंकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सारखणी येथे मुख्य रस्त्यावर वसंतराव नाईक चौकात नाका बंदी करून दुचाकी गाड्यांची कागदपत्र,वाहन चालवण्याचा परवाना,विना नंबर प्लेट अश्या गाड्यांची तपासणी करण्यात आली.,या नाका बंदी मध्ये अनेक गाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,यांच्यासह उपनिरीक्षक भोपळे, बिट जमादार पठाण,पोलिस हेड कॉन्स्टेबल सानप, मडावी, मोकले,तसेच होमगार्ड याकामी उपस्थित होते.

Previous article9 नोव्हेंबर पासून यवतमाळात श्रीमद् भागवत कथा
Next articleदुचाकी चोरास अटक बुलडाणा जिल्ह्यतून 12 मोटरसायकली हस्तगत ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here