
प्रतिनिधी :-प्रमोद झिले,येरला हिंगणघाट
वर्धा – दोन्ही कानांनी जन्मतः कर्णबधिर असलेल्या बालरुग्णांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची किमया आज सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट येथील प्रतीकराव देवगिरकर यांचा मुलगा विहान वय वर्ष दोन हा जन्मापासूनच कानाने ऐकू शकत नसल्याने बोलण्याची क्षमताही या बालकांमध्ये विकसित झाली नव्हती.दोन वर्ष होऊन सुद्धा आपला मुलगा ऐकू व बोलू शकतं नाही.याचे दुःख माञ आई आणि वडिलांना होतेच.अशातच त्याला सावंगी मेघे येथील रुग्णालयात
त्याला तपासणी साठी नेण्यात आले. त्यादरम्यान त्याच्यावर विविध तपासण्या केल्यानंतर कॉक्लियर इम्प्लांटद्वारे या बालरुग्णांवर उपचार करणे शक्य असल्याचे लक्षात आल्याने मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉ. मिलिंद कीर्तने यांना बोलविण्यात आले. डॉ. कीर्तने यांनी आजतागायत २,३०० हून अधिक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्या असून इम्प्लांटेशनचे प्रशिक्षक म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाकरिता त्यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री ह सन्मानही प्राप्त झाला आहे.या शस्त्रक्रिया प्रक्रियेत डॉ. कीर्तने यांच्यासह सावंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले संपूर्ण लक्ष शस्त्रक्रिया करण्याकडे लावले. कारण या प्रकारची शस्त्रक्रिया वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदा होत असल्याने त्यांना पण तितकीच महत्वाची शस्त्रक्रिया होती.आणि शेवटी ही शस्त्रक्रिया पार पडली. त्या दोन वर्षीय लहान मुलाने पहिल्यांदा आपल्या आई आणि बाबाचा आवाज ऐकू आला.त्या वेळी माञ विहान च्या आई डोळ्यात पाणी आले.कारण दोन वर्ष होऊन सुद्धा आपला मुलगा ऐकू आणि बोलू शकत नव्हता.मात्र कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नंतर तो ऐकू शकत आहे,याचा आनंद सुद्धा तितकाच होता.विहान आता ऐकू शकतो याचा आनंद हिंगणघाट नागरिकांना मधे तसेच आजूबाजूच्या परिसरात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.










































