
चोपड़ा:{आनंद पाटील} जळगांव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील गलंगी येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.
खून झालेल्या महिलेचे नाव सहाबाई शिवराम बारेला (वय ४५, गलंगी, ता. चोपडा) असे आहे. दीपक मगन बारेला (वय २५) असे संशयित तरुणाचे नाव आहे. सदरमयत महिला ही संशयित आरोपीची सावत्र आई आहे.
दीपक बारेला हा सावत्रआई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्र आईच्या ही चांगली वागणूक देत नसल्याने दिपक कंटाळला होता. त्यामुळे रविवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी संतापाच्या भरात दिपकने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.











































