Home बुलडाणा अंचरवाडी येथून विवाहिता “बेपत्ता वडिलांची पोस्टेला तक्रार”

अंचरवाडी येथून विवाहिता “बेपत्ता वडिलांची पोस्टेला तक्रार”

339

 

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा : – २५ वर्षीय सुषमा संदीप गवई ही महिला घरात कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली ही घटना अंचरवाडी येथे घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमोना येथील किसन रामाजी वानखेडे यांनी तक्रारी मध्ये नमूद केले की , माझी सुषमा नावाची मुलगी ही अंचरवाडी येथील संदीप गवई यांना दिली आहे मात्र मुलीला नेहमी मारहाण होत असल्याने ती गेल्या दोन दिवसापासून तीच्या सासर मधून बेपत्ता आहे . तीचा शोध घेतला असता कुठेही मिळुन आली नाही . सासरच्या लोकांना विचारले असता त्यांच्या कडून अरेरावची उत्तरे मिळत आहे मुलींचा रंग गोरा , उंची पाच फूट बाधा सडपातळ अंगात साडी ब्लाऊज , केस काळे , पायात चप्पल .असे वर्णन असलेली महिला दिसून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन , ठाणेदार गणेश हिवरकर , बिट अमलदार कैलास उगले , यांना माहिती द्यावी .असे तक्रारी मध्ये नमूद केले आहे.