Home यवतमाळ “मंगळसूत्र” विकून उभा केला गारमेंटचा व्यवसाय…!

“मंगळसूत्र” विकून उभा केला गारमेंटचा व्यवसाय…!

401

 

यवतमाळ ( प्रतिनिधी ) मनामध्ये जिद्द असली की,माणूस काहीही करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे ह्युमन रिसोर्स ग्रुप यवतमाळ…! अत्यंत हालकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिलांनी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी एक नवं धाडस केलं आणि सुरुवात झाली एका नव्या संघर्षाला. आपणही एखादा नवा व्यवसाय करावा याकरिता सर्व महिला एकत्रित आल्या आणि सुरू झाला यांनी एक नवा संकल्प.या संकल्पामध्ये प्रत्येकाने आपले विचार मांडले आणि याच कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या मार्गदर्शना नंतर त्यांनी उद्योगाचे प्रशिक्षण सुद्धा केलं. प्रशिक्षना नंतर सदर महिलांच्या सर्व कर्ज प्रकरणे बँकेत गेली परंतु बँकेला कुठल्याही प्रकारची गॅरंटी वाटली नाही. त्यामुळे बँकांनी सरळ कर्ज नाकारले. अशा वेळेस उद्योग करायचा हे उराशी त्यांनी ठरवलं. आणि मग शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपल्या मंगळसूत्राची विक्री करून त्यातून पैसा एकत्रित करून उभा केला *गारमेंटचा मोठा उद्योग* या उद्योगांमध्ये असणाऱ्या महिलांनी स्वतःचा इतिहास रचला आहे. यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या सिंघानिया नगर येथे आज या महिला उद्योग करतात जिल्ह्यातील असणाऱ्या विविध शाळांना त्या विद्यार्थ्यांची ड्रेस व इतर शालेय साहित्य अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देतात. बाजारपेठेमध्ये असणाऱ्या दरांपेक्षा या महिलांकडे असणाऱ्या दरामध्ये कमालीची तफावत आहे. जेथे 1400 ते 1500 रुपये विद्यार्थ्यांच्या स्कूल युनिफॉर्मला लागतात त्या ठिकाणी 500 ते 600 रुपयांमध्ये हा युनिफॉर्म अगदी चांगल्या प्रकारे बनवून दिल्या जातो.इतर ड्रेस स्वस्त आहेत. इतकेच नाही तर आता यवतमाळ चे नाव हे कॉटन सिटी म्हणून आहे. संपूर्ण विश्वामध्ये सर्वात लांब धाग्याचा कापूस यवतमाळमध्ये आहे. त्यामुळे याच लांब धाग्याच्या कापसाची नाळ आपल्याशी जुळवून घेत त्यांनी आता शर्ट बनवण्याचं सुद्धा तंत्र अवगत केल आहे. अत्यंत सुबक अशी शिलाई अत्याधुनिक असणाऱ्या मशीन जगामधल्या सर्वात महागड्या मशीन वरती बनविण्यात आलेलं ही सुंदर शर्ट स्वस्त दरामध्ये आजही या एच आर ग्रुप कडे उपलब्ध आहे. आणि त्यांच्या या कमालीची आणि कसरतीची मात्र कमालच आहे. संघर्ष पाचवीला पुजला असतानाच कुठल्याही प्रकारची तक्रार न करता शेवटी व्यवसायामध्ये मजाल मारणाऱ्या आणि दरमदल करत या महिलांच्या धाडसाला करावा तेवढा सलाम कमीच आहे. आता त्यांचं लक्ष हे मोठ्या कंपन्या आहेत ज्या स्वतःच्या नावाने प्रॉडक्ट विकतात हा समूह सुद्धा एक नवीन प्रॉडक्ट बाजारपेठेमध्ये आणणार आहे. यवतमाळचं नाव जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा त्यांचा हा मनसुबा कोणीच आता रोखू शकणार नाही. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन राहिले आहे ते म्हणजे यवतमाळ मध्ये 2005 ला महिलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याकरिता सातत्याने धडपड केली त्यावेळी चे तत्कालीन *जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे सर* आणि त्यांच्यात प्रेरणेतून हाच हा उद्योग उभा राहतोय एक मोठ्या धाडसाने आणि मोठ्या दिमागदार पद्धतीने सर्व घरातील काम आटपून आणि मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन या महिला एकत्रित येतात आणि आपला व्यवसाय तेवढाच महत्त्वपूर्ण पार पाडतात. आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या अनेक शाळांना या महिलांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्म बनवून सुद्धा दिलेले आहेत.त्यामुळे आता हळूहळू या ग्रुप चे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्ये सुद्धा नावलौकिक व्हायला लागले आहेत. त्यामुळे मनातली जिद्द उराशी ठेवून आकाशी झेप घेणाऱ्या या उत्तुंग इच्छाशक्ती मनामध्ये ठेवणाऱ्या सर्व *हिरकणींना आणि सावित्रीच्या लेकींना* मानाचा सलामच आहे! या कार्यक्रमासाठी प्रिया वाकडे, समता दुपारे, शुभांगी मालखेडे,कांचन जुम्नाके, सावन मडावी, उषा उके, छाया सावळे, आशा वाळके इत्यादी महिलांचा समावेश आहे.

यावेळी मंचावर अतिरिक्त जिह्लाधिकारी नरेंद्र फुलझेले,प्रशाकीय अधिकारी फुलझेले, वर्षा गायकवाड, पी एस.दुपारे,ऍड रामदास राऊत,प्रमोदींनी रामटेके,मनोज भगत,कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर दीपक नगराळे हे होते
तसेच रुपेश हिरुळकर,अशोक कांबळे या कार्यक्रमाचे संचालन समता दुपारे यांनी केले तर प्रास्ताविक कांचन जुमनाचे यांनी मांडले आभार सावन मडावी यांनी केले.