
पारोळा:{आनंद पाटील}
जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाचे बारा दरवाजे उघडल्याने नदी पात्रात अठरा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग बोरी नदी पात्रात होत आहे. बोरी नदीच्या उगमस्थानी एक सारखा जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक धरणात वाढलेली आहे. तरी नदीकाठवरील गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
बोळे तामसवाडी रस्ता बंद
बोरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने बोळे ते तामसवाडी रस्ता काही तासांसाठी बंद करण्यात आला आहे. धरणाचे पाणी जास्त सोडण्यात आले आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.











































