Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे “विदर्भ आयडॉल” पुरस्काराने सन्मानित.

डॉ. निरज वाघमारे “विदर्भ आयडॉल” पुरस्काराने सन्मानित.

144

( मंत्री सुधिर मुनगंटीवार व मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते वाघमारे यांचा गौरव)

यवतमाळ/ प्रतिनिधी
यवतमाळ शहरातील सामजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे डॉ. निरज वाघमारे यांना त्यांच्या सामजिक कार्याबद्दल ऑन धिस टाईम मिडिया या संस्थेने “विदर्भ आयडॉल २०२२” हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
कला,क्रीडा,शिक्षण,समाजकारण, राजकारण,अर्थकारण,उद्योजक, पत्रकारिता, वारकरी संप्रदाय या क्षेत्रात काम करणाऱ्या विदर्भातील काही लोकांचा या संस्थेच्या वतीने आज नागपुर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्कार करून पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने तथा सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे व अनाथांचा नाथ डॉ. शंकरबाबा पापळकर हे होतें. डॉ. निरज वाघमारे हे यवतमाळ शहरांत अविकसित क्षेत्रात प्राथमिक सुविधा, शैक्षणिक क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना मदत, महीला, युवा, मजूर व इतर गरजूवंतांना नेहमी मदत करीत असतात. कोरोना काळातही डॉ. वाघमारे यांचे भरीव कार्य यवतमाळातील जनतेने अनुभवलेली आहे. वाघमारे यांच्या कार्याचा गौरव म्हणून यापूर्वी विविध सामाजिक संस्था, संघटना, फाउंडेशनच्या वतीने त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. यात अजून एक भर म्हणून आज नागपूर शहरातील ली – मेरिडियन या हॉटेलमध्ये पार पडलेल्या “विदर्भ कार्याचा गौरव” या अंतर्गत “विदर्भ आयडॉल २०२२” हा पुरस्कार देऊन डॉ. निरज वाघमारे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अगदी कमी वयामध्ये निरज सारखा युवक स्वतःला ईश्वरीय कार्यामध्ये पाहून समाजसेवेत अग्रेसर असतो हा आदर्श समाजातील इतर युवकांनी घ्यावा असे गौरवोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढून डॉ. निरज वाघमारे यांच्या पाठीवर पुरस्कार वितरणा दरम्यान कौतुकाची थाप दिली. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. वाघमारे यांचे कार्य मी पाहत असून खरंच हे कार्य कौतुकास्पद आहे असे वक्तव्य मराठी सिने अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांनी करुन मुनगंटीवारच्या कौतुकास दाद दिली.
विदर्भात चांगल काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी तसेच समाजात काम करत असताना त्यांचा उत्साह वाढावा,हा या पुरस्कारामागील हेतू होता अशी माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास वन मंत्री सुधिर मुनगंटीवार, मकरंद अनासपुरे, अनाथांचा नाथ म्हणून ओळख असलेले डॉ. शंकरबाबा पापळकर, संजय नाथे, संदीप थोरात, माजी आमदार संजय पुरम आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वाघमारे यांना मिळालेल्या विदर्भ आयडॉल या पुरस्काराबाबत वाघमारे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.