Home जळगाव उपोषणाचावा ३५ वा दिवस हुतात्म्यांच्या नावे , “गांधी हम शर्मिंदा है तेरे...

उपोषणाचावा ३५ वा दिवस हुतात्म्यांच्या नावे , “गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है”

252

शरीफ शेख

रावेर , दि. ३१ :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून३५ व्या दिवशी हुतात्मा दिन असल्याने तो दिवस हुतात्म्यांना अभिवादन करून निषेध नोंदवण्यात आला.
सकाळी ११ वाजता सर्वप्रथम श्रद्धांजली

सकाळी ११वाजता मनपाने भोंगा वाजवले असता उपस्थित उपोषणार्थीनी स्तब्ध उभे राहून दोन मिनिटे सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

*उपोषणाला सुरुवात*
३५ व्या दिवसाचे उपोषणाची सुरवात हाफिस रहीम यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता मुफ़्ती अबुजर यांच्या दुवा ने करण्यात आली.

*हुतात्मा दिनाबाबत आदरांजली पर भाषणे*
हुतात्मा दिनानिमित्त आज उपोषण स्थळी सर्व वक्त्यांनी आपल्या महान शहीदांचे शौर्यगाथा सादर केल्या त्यात आयाज अली, अल्ताफ शेख, सलीम इनामदार, करीम सालार, फारुक शेख, गफ्फार मलिक, मुफ़्ती हारून, मुकुंद सपकाळे, प्रतिभा शिंदे, मुफ़्ती अबुजर, खलील अहमद, यांनी मार्गदर्शन केले.

*उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन*
मुफ़्ती अबुजर यांच्या नेतृवा खाली खलील अहमद, प्राध्यापक आसिफ हारून, कुद्दुस शेख, अनिस पटेल, यांनी निवेदन सादर केले.
*आज उपोषणस्थळी सर्व उपोषणार्थी च्या हातात महात्मा गांधीजींच्या प्रतिमा दिसून आल्या व सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होते गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है