Home विदर्भ मनुष्यबळाच्या अभावाने जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) आँक्सीजनवर

मनुष्यबळाच्या अभावाने जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) आँक्सीजनवर

361

 

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) ची प्रकृती चिंताजनक

रुग्णवाहीका दुरूस्तीच्या नावाखाली बेपत्ता

श्रीमती तारा शर्मा यांच्यावर आरोग्य प्रशासन मेहेरबान

-जय संविधान संघटनेची आरोग्य उपसंचालक अकोला यांना योग्य कार्यवाही ची मागणी

जिल्हा प्रतिनिधि: मनिष गुडधे
डफरिन रुग्णालयात जिल्हाभरातील रोज गरोदर महिला प्रसुति करीता दाखल होत असतात. सर्वसाधारण दररोज ओपीडी संख्या 2500 आहे. जिल्ह्यातील हे एकमेव रेफर सेंटर आहे. येथे महिलांचा योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारी वारंवार स्थानिक आरोग्य विभागास नातेवाईक करतात. प्रसुति दरम्यान माता व बालक दगावल्याचाही घटना मोठ्या प्रमाणात घडतात. लोकसंख्येच्या तुलनेत सोईसुविधा तसेच अधिकारी कर्मचा-यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. परंतु मंजुर पदेही पुर्णपणे भरलेली नाही. वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिक्षक, बालरोग तज्ज्ञ तसेच स्त्री रोग तज्ज्ञ (प्रसुति) इत्यादि महत्वाची पदेही रिक्त असुन वर्ग 4 च्या कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. 200 बेडची संख्या वाढुन 300 करण्यात यावी व एक आरोग्य विभागाचे चौकशी पैनल बसवुन तेथील उणीवांचा, समस्यांची माहीती गोळा करुन त्वरित रिक्त पदे भरण्यात यावीत.

इर्विन रुग्णालयात जिल्हाभरातील दररोज विविध आजारांनी तसेच अपघातग्रस्त शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. परंतु रुग्णांना वेळेत उपचार होत नसल्याच्या तक्रारी वारंवार ऐकायला येतात. गेल्या अनेक वर्षांपासुन येथील विविध अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरली नसल्याने रुग्णांची गैरसोय होवुन उपलब्ध कर्मचा-यांवर ताण वाढला आहे. नेत्र शल्य चिकित्सक, शरीर विकृती शास्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (भिषक), वैद्यकीय अधिकारी (शस्त्र क्रिया), वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग), बधिरीकरण शास्त्र, मनोविकृत चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी अशी महत्वपूर्ण 15 पदे रिक्त आहेत. आता तर प्रभारीच्या नावावर इर्विन चा डोलारा सुरु आहे. अनेक वार्डांमध्ये एका बेड वर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे पाहायला मिळते. येथे सर्वसाधारण दररोज ओपीडी संख्या 1500 आहे. अतिदक्षता विभागात आयसीयु बेड संख्या 6 असल्याने अनेक गंभीर, अपघातग्रस्त रुग्णांना नागपुर रेफर केल्या जाते. वेळेत उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटना ही होतच असतात. वरील परिस्थितीला कारणीभुत अपुरे मनुष्यबळ आहे. तेव्हा आपण एक चौकशी पैनल बनवुन बेड, आयसीयु बेड ची संख्या वाढवुन लोकसंख्येच्या तुलनेत त्वरित रिक्त पदे भरावी.

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य स्तरावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. अमरावती 24, अचलपुर 5, अंजनगाव सुर्जी 7, भातकुली 5, चांदुरबाजार 7, चांदुर रेल्वे 5, धामणगाव रेल्वे 6, दर्यापुर 7, नांदगाव खंडेश्वर 7, मोर्शी 7, वरुड 7, तिवसा 5 आणि मेळघाट 15 अशी रुग्णवाहिकांची संख्या आहे. अनेक तालुक्यात रुग्णवाहिका दुरुस्ती च्या नावाखाली बेपत्ता आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने गंभीर रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा व्यवस्थापक यांची चौकशी करुन त्वरित नियमीत 108 रुग्णवाहिका संख्येत वाढ करुन जनतेसाठी उपलब्ध करुन देणे.

२०१६ पासुन ते आजपर्यंत पाठ्यनिर्देशिका श्रीमती तारा शर्मा यांच्या कित्येक तक्रारी देण्यात आल्या. चौकशी समित्या नेमण्यात आल्या. परंतु यांच्यावर कार्यवाही कोणतीही झालेली दिसत नाही. उलट नियम डावलुन तिच्या मनमर्जीपणे प्रतिनियुक्ति देण्यात येते. डफरिन दवाखाना व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथेच या व्यक्तीला कारभार दिला जातो. आपणास विनंती तात्काळ तिची बदली धारणी चिखलदरा येथे करण्यात यावी. म्हणजे डफरिन दवाखाना व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथील कार्यरत कर्मचा-यांना होणाऱ्या त्रासापासुन सुटका मिळेल.

निवेदन देते वेळी मा. किरण गुडधे, दिपकभाई मेटांगे, हरिश मेश्राम, प्रेम वानखडे, नरेश पुंडकर, जितेंद्र वर्मा व आशिष इंगळे इत्यादि जय संविधान संघटन चे शिष्ठमंडळ उपस्थित होते.