Home यवतमाळ बाळासाहेब पांडे पतसंस्थेमधील सर्व व्यवहार सुरळीत…!

बाळासाहेब पांडे पतसंस्थेमधील सर्व व्यवहार सुरळीत…!

692

 

ठेवीदारांनी व ग्राहकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नयेत…!

शहरातील कोणत्याही ग्राहकाच्या पैशाला धक्का लागणार नाही – व्यवस्थापक 


यवतमाळ – कै . बाळासाहेब पांडे या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात भाग भांडवलाची गुंतवणूक झाली आहे . त्यामुळे सहाजिकच खातेदार , ठेवीदार , दैनिक ठेवीदार , कर्जदार आदींची संख्याही मोठी आहे . त्यामुळे खातेदार , ठेवीदार , दै . ठेवीदार , कर्जदार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व मनात असलेले संभ्रम काढून टाकावे , ग्राहक हेच दैवत मानून काम करणारी ही पतसंस्था आहे . कोणत्याही ग्राहकांच्या पैशाला कोणताही धक्का लागणार नाही , याची शाश्वती देण्यात आली . विरोधकांच्या कटाला लवकरच पतसंस्थेतर्फे उत्तर देण्यात येणार आहे . कोणताच घोटाळा झाला नसल्याने आम्ही कोणत्याच तक्रारीला घाबरत नसल्याचे व्यवस्थापकांनी माहिती दिली आहे .

स्थानिक दाते कॉलेज चौक , यवतमाळ परिसरात असलेल्या कै . बाळासाहेब पांडे पतसंस्थेतही कोट्यवधींचा कर्ज वितरण घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे . या प्रकरणी थेट बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार पतसंस्थेला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्लॅन असल्याचे व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले .
स्थानिक दाते कॉलेज परिसरात असलेल्या लोकप्रिय बाळासाहेब पांडे पतसंस्थेत व्यवहार सुरळीत चालू आहेत . सर्वांची ठेवी आमच्या पतसंस्थेत सुरक्षित राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी आमचा हितचिंतक ग्राहकच असल्याचे सांगण्यात आले . या शिवाय उत्तम प्रशासन आणि प्रशासक यासाठी बँकेची ओळख निर्माण झाली असून विरोधकांकडून कट कारस्थान रचित बँकेला बदनाम करण्याचे कट कारस्थान आखण्यात आले आहे . यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन व्यवस्थापकाकडून करण्यात आले आहे . सध्या बँकेत निवडणुकीचे वारे सुरू आहे . त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे . यातही नियमात न बसणारे उमेदवार विरोधकांची उमेदवारी कट झाल्यामुळे काही विरोधकांनी पतसंस्थेला बदनाम करून तक्रार केली आहे . त्यामुळे काही ठिकाणी बँकेबद्दल बँकेच्या व्यवस्थापनाबद्दल तर्क काढला जातो . तसे काही नसून बँकेमध्ये सर्वांना सर्व पद्धतीचा व्यवहार केला जात असून बँकेचे व्यवहार सुरळीत आहे , अशी माहिती व्यवस्थापकांनी  दिली आहे .