Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे वंचित बहुजन आघडीत दाखल .

डॉ. निरज वाघमारे वंचित बहुजन आघडीत दाखल .

255

भाई अमन यांच्याभाई अमन यांच्या आप भाई अमन यांच्या आप प्रवेशनानंतर शहरात दुसरी राजकीय घडामोड  शहरात दुसरी राजकीय घडामोड  आप प्रवेशनानंतर शहरात दुसरी राज

भाई अमन यांच्या आप प्रवेशनानंतर शहरात दुसरी राजकीय घडामोड  

हरीश कामारकर 
यवतमाळ – स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर विविध राजकीय उलथापालतीला सुरुवात झालेली आहे. शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांच्या प्रवेशानंतर आता युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीत आपला डेरा दाखल केला आहे.
गेल्या एका वर्षापासून जिल्ह्यातील बहुतेक नगर परिषद व जिल्हा परीषद, पंचायत समित्यांच्या कारभार प्रशासनाच्या खांद्यावर असल्याने सदर निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे. याच अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून संघटनात्मक बांधणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रबळ उमेदवाराची राजकिय पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. याच दरम्यान शहारातील दोन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध पक्षात प्रवेश केल्याने, शहराचे राजकारण ढवळून निघाले आहे. सदर दोन्हीं व्यक्तीनी यवतमाळच्या सामजिक क्षेत्रांत आपल वलय निर्माण केल्याने या दोन्ही राजकीय पक्ष प्रवेशाने आगामी नगर परिषदेत निवडणुकीत मतांच्या फुटाफुटीचे राजकारण होणार हे निश्चित. तर दोघांच्या राजकीय वलयाचा आपापल्या पक्षाला किती फायदा होतो. हे ही तितकंच महत्वाचं आहे.
विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवित असताना डॉ. निरज वाघमारे यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळे युवा वर्गा सह बहुजन समाजाचा मोठा जनाधार डॉ. निरज वाघमारे यांच्याकडे आहे तर कोरोना काळामध्ये अनेक गरजुवंताना मदत केल्याने भाई अमन यांच्या बद्दल जनतेमध्ये सहानुभूती निर्माण झाली आहे. याच बाबीचा राजकिय लाभ करून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांनी नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षांमध्ये आपला प्रवेश करून घेतला तर काल मुंबई येथील प्रदेश कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. निरज वाघमारे वंचित बहुजन आघाडी मध्ये दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन्ही राजकीय प्रवेशाने आगामी विधानसभेत मताचे ध्रुवीकरण होणार असून याचा राजकीय फायदा कोणाच्या पथ्यावर पडतो हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे, तर बहुजनांच्या मतावर आपला अधिकार अजून गाजवून राजकीय बडेजाव मिरवणाऱ्या मातब्बरांना मात्र याचा चांगलाच फटका बसेल याची ही शक्यता नाकारता येणार नाही.

———–
आगामी सर्व निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीची ताकद दाखवुन देऊ.
येत्या नगर परिषद निवडणुकांत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये आम आदमी पार्टीचे प्रबळ उमेदवार देऊन हया निवडणूका आम आदमी पार्टी पुर्ण ताकदीनिशी लढविणार आहे. येत्या जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुध्दा आप पुर्ण तयारीने ह्या निवडणूकीत उतरेल. पक्ष संघटना बांधणीच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर गावोगावी आपच्या शाखा उद्घाटन मोहीम लवकरच सुरु करण्यात येणार आहे….

भाई अमन
आप नेते, यवतमाळ

बहुजनवादी व रिपब्लिकन पक्षाचे विविध गटतट निर्माण झाल्याने जिल्ह्याला सक्षम नेतृत्व नव्हते. हीच पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. येत्या काळातील माझी पुर्ण राजकीय लढाई ही बहूजन समाजासाठी असेल.