Home यवतमाळ जनतेचा मनसेकडे वाढत चाललेला कल, इतर राजकिय पक्षांना धडकी भरवणारा – उंबरकर

जनतेचा मनसेकडे वाढत चाललेला कल, इतर राजकिय पक्षांना धडकी भरवणारा – उंबरकर

1932

( राजुर मद्ये पार पडला भव्य पक्ष प्रवेश सोहळा, गावेच्या गावे होताय मनसेत दाखल )

यवतमाळ / हरीश कामारकर
सद्य स्थितीत वणी विधानसभा मतदासंघात रोजच्या रोज मनसेत वाढत चालली इंनकमिंग आणि यातून पक्षाची वाढत चलेली ताकद ही इतर राजकिय पक्षांना धडकी भरविणारी आहे असे वक्तव्य मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी केले. काल राजूर येथे पार पडलेल्या मनसे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. राजूर येथील शेकडो युवक व महिलांनी काल मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले असताना, मेळावे, सभा – संमेलने व विविध सामजिक उपक्रमाला मोठया प्रमाणात उत आला. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चालु केलेल्या सदस्य नोंदनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात पुन्हा ॲक्टिव मोड वर आली आहे.
तर इकडे वणी विधानसभा मतदासंघात नुकत्याच पूरपिढीच्या परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणा, सामजिक संस्था व इतर राजकिय पक्ष लोकांच्या मदतीस तोकडे पडले असताना वणी विभागांत राज ठाकरे यांच्या मनसेने भरीव कामगिरी केली. या काळात मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर व इतर नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू वस्त्र आणि गुरांना खाद्य यांची मदत करुन लोकांची मने जिंकली. याचं कामाची पावती म्हणून लोकांनी आता आपला कल मनसे कडे वळविला आहे. काही दिवसांपूर्वी वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील गावांमध्ये लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर रित्या पक्ष प्रवेश करुन उंबरकर यांच्या नेतृत्वाला पसंदी दिली आहे. यातच काल वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि बाजारपेठ असलेल्या राजूर येथील शेकडो युवकांनी व महिलांनी उंबरकरांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश केला. हा प्रवेश आणि पक्षाची वाढत चालली ताकद ही मतदासंघांतील इतर राजकिय पक्षांना धडकी भरवणारी आहे असं मत मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी व्यक्त केल.
काल राजूर येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात गावातील अनेक युवकांनी मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या कार्यप्रणालीवर आम्ही खुश असुन येत्या काळात वणी विधानसभेचे चित्र पलटून या विधासभेसह सर्वच निवडणुकात मनसेचा झेंडा फडकेल असा आशावाद या युवकांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी मनसे महीला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अल्का टेकाम, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, महीला जिल्हाध्यक्ष अर्चना बोधाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धनंजय त्रिंबके, इर्शाद खान, शुभम भोयर यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वणी विधानसभा क्षेत्रात मनसेत वाढत चाललेल्या इंकमिंगचा आगामी निवडणुकांत मताच्या रुपाने किती फायदा होईल हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल….