Home मराठवाडा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष,दै.महाभारत चे संपादक विजयकुमार वाव्हळ यांना बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार...

पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष,दै.महाभारत चे संपादक विजयकुमार वाव्हळ यांना बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार जाहीर

487

 

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

नि:स्वार्थपणे सेवाभाव जोपासून समाजसेवेत अग्रेसर असणारे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व बीड जिल्हा दैनिक जय महाभारतचे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ
यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून व ह्युमन राइट्स फाऊंडेशनच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्ताने” बेस्ट सोशल वर्कर ” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे.समाजातील गोरगरीब जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या विजयकुमार वाव्हळ यांना हा पुरस्कार घोषित होताच जालना जिल्ह्यातही ठिकठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनेही अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.